08 August 2020

News Flash

‘टिकटॉक’शी कट्टीनंतर भारतीयांची Mitron शी बट्टी! रोज अपलोड होतायेत १० लाख नवे व्हिडिओ

दर तासाला पाहिले जातायेत ४० दशलक्ष व्हिडिओ...

TikTok या लोकप्रिय चिनी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅपला बॅन केल्याचा चांगलाच फायदा टिकटॉकप्रमाणेच फीचर्स असलेल्या अन्य मेड इन इंडिया अ‍ॅप्सना होतोय.  Mitron हे असंच एक मेड इन इंडिया अ‍ॅप सध्या दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे. मित्रों हे स्वदेशी शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अ‍ॅप गुगल स्टोअरवर २५ दशलक्षपेक्षा जास्तवेळेस डाउलनोड झालं आहे. जास्तीत जास्त कंटेंट क्रिएटर्सचा ओढा हे अ‍ॅप जॉइन करण्याकडे दिसत असून दररोज जवळपास १० लाख नवे व्हिडिओ तयार होत आहेत. तर, दर तासाला ४० दशलक्ष व्हिडिओ पाहिले जात आहेत.

“मित्रों प्लॅटफॉर्मवर दररोज जवळपास एक दशलक्ष नवे व्हिडिओ तयार होताना पाहून आम्हाला खूप आनंद होतो आहे. प्रत्येकजण लॉकडाउनमध्ये ज्या वेळी घरात राहण्यासाठी बांधील होता, तेव्हाच लोकांना असा डिजिटल एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, ज्यातून लोकांनी किंवा स्वत: टाकलेल्या शॉर्ट व्हिडिओद्वारे लोकांचे मनोरंजन होईल, असा आमचा उद्देश होता,” असे मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले.

एप्रिल २०२० मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाँच केलेले मित्रों हे अ‍ॅप सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरले आहे. यापूर्वी मे महिन्यामध्ये Mitron हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आलं होतं. गुगलच्या पॉलिसीचं उल्लंघन केल्यामुळे हे अ‍ॅप हटवण्यात आलं होतं. त्यावेळी, ‘कोणतेही बदल न करता दुसऱ्या अ‍ॅपचे फीचर्स आणि कंटेंट कॉपी करणं गुगलच्या नियमांचं उल्लंघन आहे. Google Play वर आधीपासून उपलब्ध असलेल्या अ‍ॅपप्रमाणेच एखादं अ‍ॅप युजर्सना अनुभव आणि फीचर देत असेल तर आम्ही अशा अ‍ॅप्सना परवानगी देत नाही. अ‍ॅप्सनी अनोख्या फीचर्स आणि सर्व्हिसद्वारे युजर्सना चांगला अनुभव द्यायला हवा’, असं गुगलने म्हटलं होतं. पण, त्यानंतर काही बदलांसह हे अ‍ॅप पुन्हा प्ले स्टोअरवर आलं. विशेष म्हणजे आता हे अ‍ॅप प्ले स्टोअरच्या टॉप चार्ट्समध्ये पोहोचलं असून 4.5 स्टार रेटिंग मिळाली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 10:12 am

Web Title: alternative to tiktok mitron hits 25 million downloads from google play store sas 89
Next Stories
1 पाच कॅमेऱ्यांचा Poco M2 Pro भारतात झाला लाँच; किंमत 13,999 रुपये
2 तणावामुळे पोटाचे विकार होतात का? घ्या ही काळजी
3 येतोय Samsung चा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन, ‘या’ तारखेला लाँच होण्याची शक्यता
Just Now!
X