15 January 2021

News Flash

बालपणात अल्झायमर जनुकांमुळे मेंदू आकुंचनाचा धोका

अल्झायमरच्या जनुकांमुळे लहान मुलांच्या मेंदू भागावर विपरीत परिणाम होऊन त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होते.

अल्झायमरच्या जनुकांमुळे लहान मुलांच्या मेंदू भागावर विपरीत परिणाम होऊन त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होते. त्याचप्रमाणे मेंदू आकुंचित होण्याचा धोका असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. यामुळे संशोधकांना या आजाराशी संबंधित नव्या संशोधनावर लक्ष केंद्रित करता येणार आहे.

अल्झायमर झालेल्यांमध्ये ‘इप्सिलोन-४’ (इ-४) हे अस्थिर करणारे जनुक कार्यरत असते. त्याचप्रमाणे इ-२ आणि इ-३ ही दोन जनुकेही त्याच वेळी कार्यरत होत असल्याचे संशोधकांनी मांडले आहे. ही जनुके लहान मुलांमध्ये कार्यरत झाल्यावर त्याचा प्रभाव जाणवू लागतो. त्यामुळे या मुलांमधील मेंदूच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडतो. त्यामुळे ही मुले मनोरुग्ण होण्याचा किंवा विचार क्षमतेवर परिणाम होण्याचा धोका मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याचे अमेरिकेतील हवाई विद्यापीठातील संशोधक लिंडा चांग यांनी म्हटले आहे.

संशोधकांनी आठ ते २० वयोगटांतील एक हजार १८७ मुलांच्या जनुकांचे आणि मेंदूचे परीक्षण केले. त्याचप्रमाणे त्यांच्यातील विचार करण्याची क्षमता आणि बुद्धिकौशल्य यांचा अभ्यास केला. मात्र या मुलांच्या जन्मापूर्वी करण्यात आलेल्या औषधोपचारामुळे त्यांच्या मेंदूच्या विकासावर विशेष प्रभाव न झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच वेळी या मुलांमध्ये इ२इ२, इ३इ३, इ४इ४, इ२इ३, इ२इ४ आणि इ३इ४ ही जनुके कार्यरत असल्याचे दिसून आले. त्याच वेळी इ४ हे जनुक कार्यरत असलेल्या मुलांचा बौद्धिक विकास इ२ आणि इ३ ही जनुके असलेल्या मुलांपेक्षा वेगळ्या पद्धतीने होत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले. इ४ हे जनुक कार्यरत असलेल्या मुलांचा मेंदू आकुंचित होऊन त्याचा मनोविकासावर परिणाम झाल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2016 1:43 am

Web Title: alzheimers disease effect on brain
Next Stories
1 पास्तामुळे लठ्ठपणावर नियंत्रण
2 फळे खा, आनंदात राहा!
3 घातक विषाणू शिंकेतून पसरत असल्याचा निष्कर्ष
Just Now!
X