जगात अनेक फॅन्सी फिटनेस रूटीन्स आहेत. त्यामुळे त्यातला कोणता तरी एक प्रकार निवडणं आणि त्यातील सातत्य टिकवून ठेवणं हा सगळ्यात कठीण भाग आहे. म्हणूनच, अनेक जण एका पाठोपाठ एक विविध व्यायाम प्रकार करून पाहतात. पण न कंटाळता कोणता व्यायाम प्रकार आपण अगदी रोज करू शकतो? याचं उत्तरच अनेकांना मिळत नाही. त्यात हवा तास रिझल्ट मिळत नाही म्हणून काहीजण काहीच दिवसांत हे सगळंच सोडून देतात आणि व्यायाम करणंच बंद करतात. पण हा काही योग्य उपाय नाही. तुम्हीसुद्धा तुमच्या वर्कआउट रुटीनबद्दल असेच सतत संभ्रमात असता का? मग सायकलिंग हा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरेल. जाणून घेऊया, सायकलिंग हा एक उत्तम व्यायामप्रकार का मानला जातो?

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदे

आपल्या सर्वांना माहित आहे की, आपल्या आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे भरपूर फायदे आहेत. हा व्यायाम प्रकार आपल्या हृदयाच्या स्नायूंवर काम करतो, तसेच स्ट्रोक, हार्ट अटॅकसारख्या गंभीर हृदयरोगांपासून आपल्याला दूर ठेवतो. डिप्रेशन, लठ्ठपणा आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी देखील सायकलिंग अत्यंत फायदेशीर आहे. दरम्यान, आता सायकलिंगपासून आपल्या शरीराला होणाऱ्या लाभांच्या या मोठ्या यादीत आणखी एक भर पडली आहे. जामा इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनानुसार, सायकलिंगमुळे मधुमेहाची लक्षणं कमी होऊ शकतात आणि लवकर मृत्यू होण्याचा धोका देखील खूप कमी होतो.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

अभ्यास काय सांगतो?

अभ्यासासाठी, संशोधक पीएचडी मॅथियास रीड-लार्सन यांनी मधुमेहाने ग्रस्त असलेल्या ७,००० हून अधिक प्रौढांच्या आरोग्य डेटाची तपासणी केली. यासाठी युरोपिअन प्रोस्पेक्टिव्ह इन्वेस्टीगेशन इंटू कॅन्सर अँड नुट्रीशन स्टडीजचा वापर करण्यात आला आहे. डेटामध्ये वैद्यकीय इतिहास, समाजशास्त्रीय आणि जीवनशैलीची माहिती देणारी १० पश्चिम युरोपियन देशांसाठीची १९९२ ते २००० दरम्यानची प्रश्नावली आहे. यातील सर्व सहभागींचे वय ५६ च्या आसपास होते. तर या अभ्यासाच्या अखेरीस त्यापैकी १,७०० जणांचं  निधन झालं होतं.

आपल्या सवारीचा आनंद घ्या, सातत्य ठेवा!

सखोल अभ्यासाच्या आधारे संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, ५ वर्षांहून अधिक काळ नियमित सायकल चालवण्याच्या व्यायामामुळे कोणत्याही कारणांमुळे असलेला लवकर मृत्यू होण्याचा धोका ३५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. या संशोधनात स्पष्टपणे असंही नमूद करण्यात आलं आहे की, सायकल चालवण्यामुळे तुमचं आयुष्य देखील वाढू शकतं. परंतु, हे लाभ मिळवण्यासाठी एकावेळी किती दूर किंवा किती वेळ सायकल चालवावी याचा उल्लेख केलेला नाही. याबाबत त्यांनी असं सांगितली कि, “या अभ्यासाचा मुख्य उद्देश हा सायकलिंगचे दीर्घकालीन फायदे समजून घेणं हा आहे. वेळेबद्दल काळजी करण्यापेक्षा एखाद्याने आपल्या सवारीचा आनंद घेणं आणि त्यात सातत्य राखणं आवश्यक आहे.”

एक एरोबिक क्रिया

सायकलिंग ही एक एरोबिक क्रिया आहे. सायकल चालवताना हृदय, रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसे या सर्व अवयवांचा व्यायाम होतो. यामुळे, आपल्या शरीरातील ऑक्सिजनची आवश्यकता आणि शरीराचं मुख्य तापमान वाढतं. हार्वर्ड विद्यापीठाच्या मते, १२ ते १३.९ मैल प्रति तास या वेगाने सायकल चालविल्याने ७० किलो वजनाचा व्यक्ती ३० मिनिटांत २९८ कॅलरी कमी करू करते. तर तीच व्यक्ती १४ ते १५.९ मैल प्रति तास वेगाने ३० मिनिटांत आपल्या सुमारे ३७२ कॅलरीज बर्न करू शकते.

तुमच्या सायकलिंगच्या वेळेतून जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला सायकल योग्यरित्या चालवणं आवश्यक आहे. सायकलिंग करताना पुढील काही गोष्टींकडे जरूर लक्ष द्या

  • डोक्यापासून पायापर्यंत तुमचं शरीर तटस्थ असावं
  • खांदे अगदी रिलॅक्स्ड आणि तुमच्या कानापासून दूर असावेत.
  • तुमचे हात निवांत आणि खांदे काहीसे वाकलेले असावेत.
  • कोपरांपासून बोटांपर्यंत तुमचे हात पुढे एका सरळ रेषेत असावेत.
  • राइडिंग पोझिशनमध्ये वाकणं  टाळा.
  • गुडघे बरोबर पायाच्या किंवा पेडलच्या वर येत असावेत.