22 November 2017

News Flash

… या सुकामेव्यामुळे वजन घटण्यास मदत

पोषणमूल्यांसाठी उपयुक्त

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 11, 2017 3:06 PM

सुकामेवा, प्रातिनिधिक छायाचित्र

सुकामेवा म्हटले की, तब्येत सुधारणारे घटक असे आपल्याला अगदी सहज वाटते. अशक्तपणा कमी करण्यासाठी तसेच वजन वाढविण्यासाठी होणारा सुकामेव्याचा वापर आपल्याला माहिती असतो. मात्र वजन घटविण्यासाठीही सुकामेवा उपयुक्त असतो. सुकामेव्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात आणि तो महाग असतो, असा आपला सामान्य समज असतो. मात्र वजन कमी करण्यामध्येही सुकामेवा अतिशय महत्त्वाचा ठरतो असे देबिका चक्रवर्ती यांचे म्हणणे आहे. एक उष्मांक म्हणजे एक कॅलरी. आहारशास्त्रात किलो कॅलरी हे परिमाण वापरतात. एक किलो कॅलरी म्हणजे एक लिटर पाण्याचे तापमान एक सेंटीग्रेडने वाढवायला जेवढी कार्यशक्ती (उष्णता) लागते तेवढी. पाहूया सुकामेव्यातून शरीराला कोणती पोषणमूल्ये मिळतात आणि वजन कमी होण्यास कशा पद्धतीने मदत होते.

जर्दाळू

जर्दाळू चवीला अतिशय उत्तम असतात. ठराविक प्रमाणात जर्दाळू खाल्ल्यास तुमचे पोट ५ तासांसाठी भरलेले राहते. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. १०० ग्रॅम जर्दाळूमध्ये २०० किलो कॅलरीज मिळतात. विशेष म्हणजे हा सुकामेवा खाण्याची कोणती विशिष्ट वेळ नसल्याने कोणत्याही वेळेला तुम्ही हे खाऊ शकता.

खजूर

खजूर खाल्ल्यानंतर दीर्घकाळासाठी तृप्ती मिळते. खजूरामध्ये बी ५ या विटॅमिनचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. १०० ग्रॅम खजुरामध्ये जवळपास २८२ किलो कॅलरीज असतात. ज्यांना जास्त खायचे नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. त्यामुळे नकळतच वजन कमी होण्यास मदत होते.

अॅसिडिटीचा त्रास होतोय? कसा कमी कराल?

पिस्ता

पिस्त्यामध्ये जास्त प्रमाणात पोषणमूल्ये असतात. यामध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन, फॅटस, आयर्न, मॅग्नेशियम असे शरीराला आवश्यक अनेक घटक असतात. १०० ग्रॅम पिस्त्यामध्ये ५६२ किलो कॅलरीज असतात. त्यामुळे १०० ग्रॅम पिस्ते खाल्ल्यास तुम्हाला बराच वेळासाठी पोट भरल्यासारखे वाटते.

मनुके

हा एक प्रसिद्ध आणि नेहमी खाल्ला जाणारा सुकामेवा आहे. यामध्ये आयोडीन जास्त प्रमाणात असल्याने ज्यांच्यामध्ये आयोडीनची कमतरता आहे. त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम आहार आहे. मानसिक आरोग्या सुधारण्यासाठीही मनुके अतिशय उपयुक्त ठरु शकतात. १०० ग्रॅम मनुक्यांमध्ये २९९ किलो कॅलरीज असतात तसेच यामध्ये फॅटसचे प्रमाणही कमी असते.

काजू

काजूमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज आणि फॅटस असतात त्यामुळे लठ्ठ लोकांनी जास्त काजू खाऊ नयेत, असे म्हटले जाते. मात्र दिवसभरात शरीराला आवश्यक असणाऱ्या आयर्नपैकी एक तृतीयांश भाग आयर्न काजूमधून मिळते. तसेच काजूमधून शरीराला आवश्यक असणारे बी१२ ही मिळते.

First Published on September 11, 2017 3:06 pm

Web Title: amazing dry fruits useful for weight loss