पदार्थांची चव वाढवण्यासाठी जेवणात हमखास लिंबाचा वापर होतो. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व तर असतेच त्याशिवाय यातील फायबरचा पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो. लिंबाच्या रसाचा वापर करून झाल्यानंतर अनेकजण त्याच्या साली फेकून देतात. पण सौंदर्य खुलवण्यापासून ते भांड्यांवरचे चिवट डाग घालवण्यापर्यंत अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो. तेव्हा लिंबाच्या सालीचा वापर कशाप्रकारे करता येऊ शकतो हे जाणून घेऊयात.

वाचा : चेहऱ्याचे सौंदर्य खुलवायचेय? हे आहेत उपाय

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

वाचा : गुणकारी आल्याचे आठ फायदे

– अनेकदा जेवण्याच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. साबणाने देखील हा चिवटपण जात नाही. एखादा पदार्थ करपला की भांड्याच्या तळाला डाग राहतात अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासली की चिवटपणा लगेच निघून जातो.
– कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो अशावेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी, सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही.
– चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर येणार काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो.
– फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर दोन तीन लिंबाच्या साली ठेवाव्या, फ्रिजेमधी दुर्गंधी लगेच दूर होते.
– घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी, मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो.
– लिंबांच्या सालीचा वापर करून तुम्ही नखं स्वच्छ करू शकता. लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळीच चमक देखील येते.
– ढोपर किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याच काळवंडलेली त्वचा उजळते.