26 October 2020

News Flash

Amazon Alexa सोबत आता हिंदीत बोला !!

आता हिंदीतून "अॅलेक्सा बॉलीवुड के गाने सुनाओ" अशा प्रकारच्या विविध कमांडचा वापर करता येणार

Amazon Alexa सोबत आता तुम्ही हिंदीत देखील बोलू शकणार आहात. Alexa या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटला आता हिंदी भाषेचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. भारतीय युजर्ससाठी विविध कंपन्यांनी स्थानिक भाषांचा सपोर्ट देण्यास सुरूवात केली आहे. गुगल असिस्टंटने सुमारे एक वर्षापूर्वीच हिंदी भाषेचा सपोर्ट दिला आहे.

नव्या अपडेटमुळे भारतातील हजारो युजर Alexa ला हिंदीतून ‘कमांड’ देऊ शकणार आहेत. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली. भारतात बहुतांश घरांमध्ये हिंदी बोलली जाते, त्यामुळे भारतीय युजर्सच्या सोयीसाठी विशेष करुन हे फीचर आणल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. हिंदीचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम युजर्सना ‘Alexa help me set up hindi’ ही कमांड द्यावी लागेल. त्यानंतर हिंदीतून “अॅलेक्सा बॉलीवुड के गाने सुनाओ” अशा प्रकारच्या विविध कमांडचा वापर करता येणार आहे.

हिंदी भाषेचं हे फीचर Echo मालिकेतील सर्व उपकरणांमध्ये उपलब्ध करण्यात आलं आहे. सध्याचे Echo वापरकर्ते सेटिंगमध्ये जाऊन लँग्वेज पर्यायावर क्लिक करुन हिंदी निवडू शकतात. भारतीय युजर्ससाठी विविध कंपन्यांनी स्थानिक भाषांचा सपोर्ट देण्यास सुरूवात केली आहे. गुगल असिस्टंटने सुमारे एक वर्षाआधीच हिंदी भाषेचा सपोर्ट दिला आहे. आता अमेझॉनच्या अलेक्झालाही हिंदीचा सपोर्ट मिळाला आहे. यानंतर आता मराठी भाषेचा सपोर्ट कधी दिला जाणार याबाबत उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 9:03 am

Web Title: amazon alexa gets hindi language support sas 89
Next Stories
1 VIDEO: पाहा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंगचे ते सहा षटकार
2 जॉन सीनाने पोस्ट केला सुशांत सिंह राजपूतचा भारतीय सैनिकांबरोबरचा फोटो; नेटकरी म्हणाले…
3 घनदाट जंगलात फसला सॉफ्टवेअर इंजिनिअर, पाइपलाइनने दाखवला मार्ग
Just Now!
X