जीएसटी करप्रणालीमुळे काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉनने आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स जाहीर केल्या होत्या. त्यानंतर अॅमेझॉनतर्फे पुन्हा एकदा नव्याने ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या ऑफर्स अॅमेझॉनने आपल्या प्राईम यूजर्ससाठीच जाहीर केल्या असून भारतात पहिल्यांदाच प्राईम डेचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल आज (१० जुलै) सायंकाळी ६ वाजल्यानंतर सुरु होणार असून पुढील ३० तास हा सेल सुरु असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. अॅमेझॉन प्राईमचे सदस्य या सेलमधील विविध ऑफर्स आणि सवलतींचा फायदा घेऊ शकणार आहेत.

१३ देशांमध्ये आज एकाच दिवशी, एकाच वेळी  सुरु होणाऱ्या या सेलसाठी अॅमोझॉनने अनेक मोठ्या ब्रँडसोबत टायअप केले आहे. अॅमेझॉनचे प्राईम मेंबर व्हायचे असल्यास एक वर्षासाठी ४९९ इतकी रक्कम भरुन होता येते. यामध्ये ग्राहकांना विविध ऑफर्सचा लाभ मिळतो. भारतात मागील काही दिवसात ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे याशिवाय प्राईम यूजर्सची संख्याही वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद पाहता कंपनीने भारतात पहिल्यांदाच प्राईम डे साजरा करण्याचे ठरविले आहे. सध्या अनेक देश कंपनीच्या क्रमवारीत अव्वल आहेत आणि भारत या क्रमवारीत तेराव्या स्थानावर आहे. या सेलमुळेही प्राईम मेंबरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता प्रत्येक तीन मेंबर्समध्ये १ प्राईम मेंबर असतो.

एकावर एक फ्री

अॅमेझॉन टीसीएल कंपनीच्या टीव्हीवर एक खास ऑफर देत आहे. ५५ इंचाचा अॅंड्रॉईड स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यास ग्राहकांना त्यासोबत ३२ इंचाचा त्याच कंपनीचा एचडी रेडी टीव्ही मिळणार आहे. याशिवाय इतरही अनेक उत्पादनांवर विविध ऑफर्स मिळू शकतील. याशिवाय एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १५ टक्के सूट मिळणार असल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

प्राईम डिल्स

प्राईम डेच्या निमित्ताने अॅमेझॉन आपल्या ग्राहकांसाठी २० नवी उत्पादने बाजारात आणत आहे. याशिवाय ग्राहकांकडून ज्या उत्पादनांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे त्यांच्यावर अतिरिक्त ऑफर्स देण्यात आल्या आहेत. सेलच्या पहिल्या दिवशी सायंकाळी कंपनीने रेडमी कंपनीचे काही नवीन स्मार्टफोनही लॉंच केले. याशिवाय अभिनेता सलमान खान याच्या बिईंग ह्यूमन या ब्रॅंडची इको फ्रेंडली सायकलही यामध्ये लॉंच केली जाणार आहे.

इतर ऑफर्स

टी-शर्ट आणि टॉपवर ६० टक्के सवलत
गॅस आणि शेगडीवर साधारण ३५ टक्के सवलत
चपलांच्या मोठ्या ब्रॅंडसवर ५० टक्क्यांहून अधिक सवलत
आणि इतरही अनेक ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत.