01 December 2020

News Flash

लॉकडाउनदरम्यानही अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ४० अब्ज डॉलर्सची वाढ

करोना संकटादरम्यान अनेकांना मोठं नुकसानही झालं होतं

सध्या जगभरात करोनाचं संकट आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांनी कोरोनाच्या संकटादरम्यानही मोठी कमाई केली आहे. लॉकडाऊनदरम्यान बेझोस यांच्या संपत्तीत सुमारे ४० अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनं दिलेल्या माहितीनुसार बेझोस यांच्याकडे १५५ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. दरम्यान, अ‍ॅमेझॉनच्या शेअर्सच्या वाढलेल्या किंमतींचा फायदा जेफ बेझोस यांना झाल्याचं म्हटलं जात आहे. करोनाच्या संकटादरम्यान अनेक कंपन्यांना मोठ्या संकटातून जावं लागलं होतं. परंतु अ‍ॅमेझॉनच्या शेअर्सनं यादरम्यानही उत्तम कामगिरी केली.

कंपन्यांना संकटातून जावे लागले असताना अ‍ॅमेझॉनने शेअर बाजारामध्ये चांगली कामगिरी केली. तसंच यादरम्यानही अ‍ॅमेझॉनच्या शेअर्सची किंमत २ हजार डॉलर्सच्या वरच राहिली असल्याचंही म्हटलं जात आहे. पहिल्यांदाच त्यांची एकूण संपत्ती १५० अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचली नाही. यापूर्वीही जुलै २०१८ मध्ये त्यांची संपत्ती १५० अब्ज डॉलर्सच्या वर गेली होती.

दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीस अ‍ॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अमित अग्रवाल यांनी माणीत झालेली वाढ पूर्ण करण्यासाठी तसंच या कठिण काळात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी आपल्या ऑपरेशनल नेटवर्कमध्ये ५० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच कंपनी अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. तसंच सुरक्षित कामकाजाचं वातावरणंही निर्माण करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले होते. करोनाच्या संकटकाळात जगभरातील अनेक कंपन्यांवर आणि क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. प्रामुख्यानं एव्हिएशन, ट्रॅव्हल आणि टुरिझम या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 12:55 pm

Web Title: amazon founder jeff bezos wealth increased by 40 billion dollars during coronavirus pandemic jud 87
Next Stories
1 सीतेने अग्निपरीक्षा दिली म्हणजे नेमकं काय केलं होतं?
2 व्हायरल फोटोमधील ‘ती’ चिमुकली आहे तरी कोण?
3 जादूटोण्याच्या संशयावरुन मामीचा खून; शीर हातात घेऊन पोलीस स्थानकात गेला अन्…
Just Now!
X