News Flash

‘गेम लव्हर्स’साठी अ‍ॅमेझॉनवर खास सेल ; TV, लॅपटॉपवर आकर्षक डिस्काउंट

Amazon Grand Gaming Days सेल सुरू

गेम खेळण्याची आवड असणाऱ्यांसाठी इ-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर एक खास सेल सुरू झाला आहे. सोमवारी रात्री 12 वाजेपासून Amazon Grand Gaming Days सेल सुरू झाला असून 23 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत हा सेल लाइव्ह असेल. या सेलमध्ये गेमिंगशी निगडित अनेक प्रोडक्ट्सवर 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर आहेत. यामध्ये लॅपटॉप, मॉनिटर, अ‍ॅडव्हान्स हेडफोन, गेमिंग कन्सोल्स, ग्राफिक कार्ड्स, स्मार्ट टीव्ही यांसारख्या प्रोडक्ट्सचा समावेश आहे. याशिवाय Lenovo, Acer, ASUS, LG, HP आणि Sony या ब्रँड्सच्या गेमिंग डिव्हाइसवरही सेलमध्ये 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिलं जात आहे.

ग्रँड गेमिंग डेज सेलमध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या ब्रँडवर नो-कॉस्ट इएमआय आणि एक्स्चेंज ऑफरचाही लाभ घेता येईल. आयसीआयसीआयच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर अनुक्रमे 5 आणि 10 टक्के सवलत मिळेल. याशिवाय अतिरिक्त किमान 8000 रुपयांच्या खरेदीवर अतिरिक्त 1,500 रुपये डिस्काउंटचीही ऑफर आहे.

10 हजारापेक्षा कमी किंमतीत LG चा गेमिंग मॉनीटर :-
या सेलमध्ये LG चा 24 इंचाचा गेमिंग मॉनीटर केवळ 9,722 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. अल्ट्रा एचडी 4K फ्लिकर फ्री टेक्नॉलॉजी यामध्ये आहे.

सॅमसंग सीरिज 5 फुल HD LED स्मार्ट TV :-
49 इंचाचा हा मोठा डिस्प्ले असलेला टीव्ही सेलमध्ये 53,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. मोठा डिस्प्ले, डॉल्बी डिजिटल प्लस साउंड आणि मल्टि आउटपुट ऑडिओ यांसारखे अनेक फीचर्स यामध्ये आहेत. याशिवाय Metz 40 Smart TV हा टीव्ही गेमर्सना बजेटमध्ये म्हणजे 16 हजार 299 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Lenovo Legion Y540 :- या गेमिंग लॅपटॉपवर सेलमध्ये डिस्काउंट मिळेल.  9TH जनरेशन कोर i7 प्रोसेसर आणि NVIDIA GeForce GTX 1650 4 GB हे ग्राफिक कार्ड असलेला हा दमदार लॅपटॉप सेलमध्ये 78,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Acer च्या गेमिंग लॅपटॉपवरही डिस्काउंट :-
Acer Nitro 7 9th Gen Core i7 या लॅपटॉपवरही सेलमध्ये डिस्काउंट मिळेल. Nvidia GeForce GTX 1660Ti 4GB ग्राफिक कार्ड असलेला हा लॅपटॉप सेलमध्ये 94 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय अन्य अनेक डिव्हाइस या सेलमध्ये डिस्काउंटसह कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 1:13 pm

Web Title: amazon grand gaming days starts best offers on video game consoles and more get all details sas 89
Next Stories
1 ‘शाओमी’ने लाँच केले ‘वायरलेस इअरफोन’, किंमत ₹1,000 पेक्षा कमी
2 Realme Narzo 10 खरेदी करण्याची संधी, कमी किंमतीत दमदार फीचर्स
3 स्वस्त झाला सॅमसंग गॅलेक्सी A21s , जाणून घ्या नवी किंमत आणि फीचर्स
Just Now!
X