Amazon Great Indian Festival 2020 : सण उत्सवामध्ये किंवा त्याआधी मोठ्या डिस्काऊंटमध्ये नवनवीन प्रॉडक्ट्स खरेदी करण्याचा प्रत्येकाचा मानस असतो. Flipkart चा बहुप्रतिक्षीत ‘बिग बिलियन डेज सेल’ १६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. याचप्रमाणे Amazon चा Great Indian Festival ची सुरुवातही १७ ऑक्टोबरपासून होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी Great Indian Festival हा सेल २४ तास आधीच सुरु होणार आहे. तसेच इतर ग्रांहकापेक्षा प्राइम मेंबर्स असणार्यांना जास्त फायदा मिळणार आहे. हा सेल पाच दिवस चालणार आहे. या सेलमध्ये मोबाइल फोन्स, अक्सेसरीज आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह अन्य कॅटिगरीजचे प्रॉडक्ट्सवर मोठ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

Amazon Great Indian Festival सेलदरम्यान एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआयद्वारे खरेदी केल्यास दहा टक्केंचा इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. त्याशिवाय अ‍ॅमेझॉन इंडियावर पहिल्यांदाच शॉपिंग करणाऱ्यांना एक हजार रुपयांच्या पुढे खरेदी केल्यानंतर ५ टक्केंचा अतिरिक्त कॅशबॅक देण्यात येणार आहे.

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये कंपनी छोट्या व्यावसायिंका प्रमोट करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याशिवाय वनप्लस 8T आणि सैमसंग गॅलेक्सी एस20 FE या नवीन लाँच झालेल्या स्मार्टफोन्सवरही मोठी सूट मिळणार आहे. अ‍ॅमेझॉनवर तयार करण्यात आलेल्या मायक्रोसाइटनुसार, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये सहा हजारपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक्स आणि अक्सेसरीजच्या डिल्सवर अनेक शानदार ऑफर देण्यात येणार आहेत.

अ‍ॅमेझॉन सेलदरम्यान गेमिंग डिवाइसेवर ५५ टक्केंपर्यंतचा डिस्काउंटही देण्यात येणार आहे. अशाच पद्धतीने इतर अनेक सॉफ्टवेयर प्रॉडक्टसवर ७० टक्केंचा डिस्काउंट मिळणार आहे. अ‍ॅमेझॉन सेलमध्ये अ‍ॅमेझॉन अॅको, फायर टीवी आणि किंडल डिवाइसेज वर 50 टक्के पर्यंतची सूट मिळणार आहे. त्याशिवाय टीवी आणि होम अप्लायंसेज वर 65 टक्केंची सूट देण्यात येत आहे. अ‍ॅमेझॉनने नो-कॉस्ट ईएमआयसाठी बजाज फिनजर्वसोबत भागिदारी केली आहे.

आणखी वाचा :

बंपर ऑफर्स! ५५ हजार रुपयांचा फोन फक्त २० हजार रुपयांत

‘या’ लॅपटॉपवर तब्बल ४५ हजार रुपयांची सूट

Samsung च्या ‘या’ फोन्सवर ३० हजारांची सूट, जाणून घ्या भन्नाट ऑफरबद्दल

Flipkart Big Billion Day 2020 : जाणून घ्या ऑफर्स, वेळ आणि काय काय खरेदी करण्याची आहे संधी

भन्नाट ऑफर : ७० टक्के रक्कम द्या अन् सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन घरी घेऊन जा