अॅमेझॉनने आपल्या ग्राहकांसाठी यावर्षीच्या पहिल्यावहिल्या सेलची घोषणा केली आहे. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीने अॅमोझॉनने ग्रेट इंडियन सेलची घोषणा केली आहे. हा सेल २० ते २३ जानेवारीपर्यंत ग्राहकांसाठी खुला असेल. तीन दिवसांच्या सेलमध्ये ग्राहकांना एकाहून एक आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत. एचडीएफसीच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड वर १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे. यात मोबाईलपासून इतरही इलेक्ट्रॉनिक गॅझेटसवर सूट मिळणार आहे. यात वॉशिंग मशिन, लॅपटॉप अशा विविध उपकरणांवर सूट मिळेल.

सेलमध्ये स्मार्टफोनवर नो-कॉस्ट EMI आणि एक्स्चेंज ऑफर यांसारख्या एकाहून एक आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. OnePlus 6T, शाओमीचा RedMi Y2, Huawei Nova 3i, Honor 8X, Vivo V9, iphone X इतर अनेक मोबाईलवर ऑफर आहे. याबरोबरच इतर इलेक्र्टॉनिक उत्पादनांवर ६० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. अमेझॉन टिव्ही आणि इतर उपकरणांवर ५० टक्के सूट मिळणार आहे. अॅमेझॉनचे प्राईम मेंबर असणाऱ्यांना लॅपटॉपवर ३० हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अॅमेझॉनचा हा सेल ही तुमच्यासाठी उत्तम संधी ठरु शकतो.