News Flash

Amazon वर नववर्षातला पहिलाच सेल, शानदार ऑफर्स अन् भरघोस डिस्काउंट

69 रुपयांपासून मोबाइल अ‍ॅक्सेसरीज, 99 रुपयांपासून इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीज आणि 299 रुपयांपासून हेडफोन्स-स्पीकर, याशिवाय...

ई-कॉमर्स संकेतस्थळ ‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘ग्रेट इंडियन सेल’ला (Great Indian Sale)लवकरच सुरूवात होत आहे. वर्ष 2020 मधला अ‍ॅमेझॉनचा हा पहिलाच सेल असेल. 19 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान हा सेल सुरू असेल. तर, अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्ससाठी 18 जानेवारी दुपारी 12 वाजेपासून सेल सुरू होईल. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन अँड ब्युटी, होम अँड किचनसह अनेक प्रोडक्ट्सवर शानदार ऑफर्स आहेत. सेलमध्ये SBI क्रेडिट कार्डने खरेदी करणाऱ्यांना 10% इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

स्मार्टफोन्सवर भरघोस सवलत :
अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये लेटेस्ट आणि टॉप सेलिंग स्मार्टफोन्सवर 40% पर्यंत डिस्काउंट मिळेल. टॉप ब्रँड्सवर एक्सचेंज ऑफर अंतर्गत 16,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. तर, अवघ्या 69 रुपयांपासून मोबाइल अ‍ॅक्सेसरीज आणि 99 रुपयांपासून इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीज खरेदीसाठी उपलब्ध असतील. या सेलमध्ये अनेक लॅपटॉपवर भरघोस डिस्काउंटची ऑफर आहे. तर, कॅमेरा खरेदीवरही जवळपास 10 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये तुम्ही 299 रुपयांपासून हेडफोन्स आणि स्पीकर खरेदी करु शकतात. याशिवाय फिटनेस बँड्स आणि स्मार्टवॉचवर 60% पर्यंत डिस्काउंट मिळेल.

होम अँड किचन प्रोडक्ट्सवर 80% पर्यंत डिस्काउंट:
ग्रेट इंडियन सेलमध्ये होम अँड किचन प्रोडक्ट्सवर 80% पर्यंत डिस्काउंट मिळेल. तर, किचन अँड डायनिंगवर 75% पर्यंत सवलत आहे. याशिवाय फर्नीचरवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे. फुटवेअर 80 टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळतील, तर स्मार्ट टीव्हीवर 60 टक्क्यांपर्यंत सवलत आहे.

इको, फायर टीव्ही आणि किंडलवर 45% पर्यंत सूट :
या सेलमध्ये इको, फायर टीवी आणि किंडलवर 45 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. फायर टीव्ही स्टिकवर 1200 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते, तर इको आणि अ‍ॅलेक्सा डिव्हाइसवर 45 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे. किंडल ई-रीडर्सवरही 3,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 4:04 pm

Web Title: amazon great indian sale offers on smart phones electronics and other home products know all offers sas 89
Next Stories
1 मखाणा कसा तयार करतात माहितीये का?
2 केवळ ‘हे’ करा आणि WhatsApp चॅटिंगमध्ये ‘टाइपरायटर फॉन्ट’ची मजा घ्या
3 Flipkart ने लाँच केला पहिला लॅपटॉप, किंमत…
Just Now!
X