22 October 2020

News Flash

आजपासून Amazon चा ‘फॅब फोन फेस्ट’, आकर्षक ऑफर्स आणि भरघोस सवलत

'वनप्लस 6 टी'वर बंपर सूट, जाणून घ्या कोणत्या फोनवर किती सवलत

जर नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही नक्कीच योग्य वेळ आहे. कारण, इ-कॉमर्स संकेतस्थळ  Amazon वर आजपासून ‘फॅब फोन फेस्ट’ या सेलला सुरूवात झाली आहे. या दरम्यान तुम्हाला अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट मिळणार आहे.

यामध्ये अॅपल आयफोन एक्स आणि वनप्लस 6 टी फोनचाही समावेश असणार आहे. वनप्लस 6 टी हा स्मार्टफोन या सेलमध्ये 27 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय सेलमध्ये रेडमी वाय3, रेडमी 7, सॅमसंग एम20 आणि सॅमसंग एम30 यांसारखे फोनही उपलब्ध आहे. आतापर्यंत हे फोन केवळ फ्लॅशसेलमध्येच उपलब्ध होते. आजपासून सुरू झालेला हा सेल तीन दिवसांनी म्हणजेच  13 जून रोजी संपेल.  सॅमसंग गॅलेक्सी नोट 9, वीवो नेक्स, हुआवेई पी 30 प्रो आणि ओप्पो आर 17 हे स्मार्टफोनही या फेस्टमध्ये उपलब्ध आहेत. एक्सचेंज ऑफर आणि ‘नो कॉस्ट इएमआय’चीही सुविधा या सेलमध्ये आहे. अॅमेझॉनवर iPhone X, OnePlus 6T, Samsung Galaxy M30 आणि Xiaomi Redmi Y3 च्या खेरदीवर सर्वाधिक आकर्षक ऑफर देण्यात आली आहे.

जाणून घेऊया काही लोकप्रिय स्मार्टफोनवर किती ऑफर –

-वनप्लस 6T च्या 8GB + 128GB व्हेरिअंट 41 हजार 999 रुपयात लाँच केला होता. हा फोन या फेस्टमध्ये 27 हजार 999 रुपयात मिळणार आहे.

-6 हजार 500 रुपयांच्या सवलतीसह शाओमीचा एमआय ए2 हा स्मार्टफोन 10,999 रूपयांना उपलब्ध असेल.

-Apple चा आयफोन एक्स आर (64 जीबी स्टोरेज मॉडेल) 59 हजार 999 तर 128 जीबी स्टोरेज मॉडेल 64 हजार 999 रूपयांना उपलब्ध असेल.

-सॅमसंग गॅलेक्सी एम 20 फोन 10 हजार 990 रुपयात लाँच केला होता. हा फोन आता 9 हजार 990 रुपयात उपलब्ध आहे.

-सॅमसंगचा  एम 30 हा स्मार्टफोन पंधराशे रुपयांच्या डिस्काउंटसह 14 हजार 990 रुपयांमध्ये मिळेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 12:46 pm

Web Title: amazon india fab phone fest know all offers sas 89
Next Stories
1 TVS Jupiter ZX स्कूटर नव्या अवतारात लाँच, ‘Activa 5G’ ला टक्कर
2 आता विमान प्रवास महागणार
3 ‘इंटरनेटच्या जास्त वापरामुळे मेंदूत बदल’
Just Now!
X