News Flash

अॅमेझॉनमध्ये ‘या’ आहेत नोकरीच्या अनोख्या संधी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी उत्तम संधी

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मोबाईल आणि इंटरनेटमध्ये वेगाने झालेल्या बदलांमुळे तर अगदी कोणतीही गोष्ट आपण घरबसल्या एका क्लिकवर सहज करु शकतो. ई कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याने ऑनलाइन शॉपिंगच्या कंपन्याही आपले जाळे पसरताना दिसत आहेत. यातही ग्राहकांना एकाहून एक आकर्षक ऑफर्स देत आपल्याकडे वळविण्याचे कामही या कंपन्या सध्या मोठ्या प्रमाणात करत आहेत. याच अॅमेझॉनमध्ये आता नोकरभरती करण्यात येणार आहे.

अॅमेझोनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये तुम्हाला मिळतील ‘या’ खास ऑफर्स

नुकताच अॅमेझॉनने ग्रेट इंडियन सेल जाहीर केला असून २१ ते २४ जानेवारी या कालावधीत असणाऱ्या सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्पादनांवर भरघोस सूट दिली जाणार आहे. या सेलच्यादृष्टीने अॅमेझॉनने ही नोकरभरती होणार असल्याचे जाहीर केले आहे. यानिमित्ताने विविध पदांसाठी अॅमेझॉनमध्ये ५५०० जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या सेलदरम्यान ग्राहकांकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल अशी कंपनीला आशा आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून कंपनी नोकरभरती करणार आहे. कंपनीच्या कस्टमर केअरमध्येही जवळपास १ हजार सहाय्यकांना काम दिले जाणार आहे. यामुळे ग्राहकांच्या तक्रारी आणि मागण्या वेळीच पूर्ण केल्या जातील. भारतातील प्रमुख मेट्रो सिटींप्रमाणेच हैदराबाद आणि बॅंगलोरमध्ये ही भरती होणार आहे.

हा ग्रेट इंडियन सेल ग्राहकांसाठी ही खरेदीची उत्तम संधी ठरणार आहे. या सेलमध्ये १ कोटी ६० लाखांहून अधिक उत्पादनांवर सूट देण्यात आली आहे. यामध्ये अनेक कपडे, होम अॅप्लायन्सेस, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. जे ग्राहक अॅमेझॉनच्या पे बॅलन्सचा वापर करून खरेदी करतील त्यांना २०० रुपयांपर्यत कॅशबॅक मिळणार आहे. सेलबरोबरच ग्राहकांना एचडीएफसी बँकेकडून जास्तीची १० टक्के कॅशबॅक सवलत देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 12:56 pm

Web Title: amazon india will offer 5500 jobs in india for their service
Next Stories
1 सरळ उभे राहिला नाहीत तर शरीराचा समतोल बिघडेल
2 मधुमेद – एक नाकचूक
3 नियमित योगामुळे मेंदूच्या हानीस प्रतिबंध
Just Now!
X