News Flash

Onida ने लाँच केले दोन स्मार्ट TV, किंमत ₹12,999 पासून सुरू

Amazon आणि Onida ची भागीदारी...

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) भारतात ‘Fire TV एडिशन स्मार्ट टेलिव्हिजन’च्या विक्रीसाठी ओनिडासोबत (Onida) भागीदारी केली आहे. Onida फायर टीव्ही एडिशन स्मार्ट टीव्ही 32 आणि 43 इंच अशा दोन साइजमध्ये लाँच करण्यात आलेत. ओनिडा स्मार्ट टीव्हीची विक्री 20 डिसेंबरपासून सुरू होईल.

ओनिडा फायरटीव्ही एडिशनद्वारे प्राइम व्हिडियो, होटस्टार, युट्यूब नेटफ्लिक्स आणि अन्य अनेक प्लॅटफॉर्म्सहून चित्रपट आणि टीव्ही शो पाहता येणार आहेत. 32 इंचाच्या टीव्हीमध्ये एचडी डिस्प्ले, तर 43 इंचाच्या टीव्हीमध्ये फुल एचडी रिझोल्युशन मिळेल. ओनिडाचा हा टीव्ही सहजपणे इंटरनेटशी कनेक्ट करता येतो. यातील फायर टीव्ही प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही स्टिकप्रमाणेच आहे. टीव्हीसोबत तीन एचडीएमआय पोर्ट मिळतील. याशिवाय टीव्हीसोबत असलेल्या रिमोटमध्ये अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्साचा सपोर्टही मिळेल.

अ‍ॅमेझॉनने फायरटीव्ही स्मार्ट एडिशन सर्वप्रथम अमेरिका व कॅनडामध्ये लाँच केला होता. त्यानंतर कंपनीने डिक्सन्स कारफोन, मीडियामार्केटसॅटर्न आणि ग्रंडिग यांच्याशी भागीदारीद्वारे ब्रिटन, जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये हा टीव्ही लाँच केला.

किंमत –
32 इंचाच्या टीव्हीची किंमत 12 हजार 999 रुपये आहे, तर 43 इंचाच्या टीव्हीची किंमत 21 हजार 999 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 5:49 pm

Web Title: amazon partners with onida to bring fire tv edition smart tvs in india sas 89
Next Stories
1 सुपर मॉम : मॅचच्या ‘ब्रेक’दरम्यान तिने केलं स्तनपान, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
2 तिची टिकटॉकवरील कमाई पाहून थक्क व्हाल, लोकप्रियता वाढल्याने नेमावे लागले बॉडीगार्ड
3 Jio ने हटवला ₹49 चा प्लॅन, आता ₹75 पासून सुरूवात
Just Now!
X