22 April 2019

News Flash

आता Amazon वरही मिळणार UPI सेवा

PayTM आणि PhonePe ला टक्कर देण्याची तयारी

अमेरिकेची कंपनी असलेल्या Amazon ने भारतात आपल्या प्लॅटफॉर्मवर युनिफाईड पेमेंट सर्व्हीस (UPI) सेवा सुरु केली आहे. ही सुविधा कंपनीने अॅक्सिस बँकेसोबत भागीदारीमध्ये सुरु केली आहे. युजर्सना ही सुविधा अॅमेझॉन अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. भारतात कंपनीने आपले UPI हँडल सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या काही सुजर्ससाठी हे UPI हँडल सुरु करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे.

यासाठी युजर्सना आपले बँक खाते Amazon UPI अॅपशी लिंक करावे लागणार आहे. यामुळे पैसे पाठवणे आणि मिळवणे हे काम सोपे होणार आहे. यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे कोणाला तुम्हाला पैसे पाठवायचे असतील तर आपला बँक अकाऊंट नंबर आणि आयएफएससी कोड सांगण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही UPI अॅपच्या माध्यमातून व्हर्चुअल पेमेंट अॅड्रेसच्या माध्यमातून तुमच्या अकाऊंटवर पैसे पाठवले जाऊ शकतात. आता कंपनी @apl हॅंडल सुरु करत असून तुम्हाला तुमचे कोणते बँक अकाऊंट Amazon UPI अकाऊंटशी लिंक करायचे असल्यास मोबाईल क्रमांक आणि @apl (8635191634@apl) असा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस मिळेल.

भारतात सध्या UPI पेमेंटच्या क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये PayTM, PhonePe, Amazon Pay, Mobikwik, Freecharge या वॉलेट कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय मागच्या काही काळात Google च्या Google Pay अॅपनेही युजर्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली आहे. Amazon प्रमाणेच Whatsapp ही आता भारतात UPI सुविधा घेऊन येणार असल्याची चर्चा आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर हे काम सुरु असून लवकरच ही सुविधा सर्वसामान्यांसाठी सुरु होईल.

First Published on February 11, 2019 12:21 pm

Web Title: amazon pay launches upi services with its own handle