जर नवीन स्मार्टफोन किंवा घरासाठी एखादं स्मार्ट डिव्हाइस, किंवा अन्य कोणतं इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करायचं असेल तर चांगली संधी आहे. कारण, ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन इंडियावर Amazon Prime Day सेलला सुरूवात झाली आहे. सहा आणि सात ऑगस्ट दोन दिवसांच्या या सेलमध्ये अनेक शानदार ऑफर्स आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये नुकतेच लाँच झालेले काही स्मार्टफोन देखील उपलब्ध होणार आहेत. सेलमध्ये बहुतांश बजेट, मिड-रेंज सेगमेंटमधील स्मार्टफोन, ट्रू वायरलेस ईअरबड्स, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच, अ‍ॅमेझॉन डिव्हाइस (Echo, Fire TV आणि Kindle e-readers)यांसारख्या अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळेल. ग्राहकांसाठी या सेलमध्ये बँक ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय यांसारखे पर्याय मिळतील. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, कॅमेरा, स्पीकर, लॅपटॉप, इअरफोन आणि अन्य अनेक गॅजेट्स सेलमध्ये कमी किंमतीत खरेदी करता येतील. याशिवाय रेफ्रिजरेटर्स, AC आणि ईको स्मार्ट डिस्प्लेवर 40 टक्के डिस्काउंटची ऑफर आहे.  कंपनीने या सेलसाठी एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली आहे. यानुसार, एचडीएफसी कार्ड आणि ईएमआयवर 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.

कोणत्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट :-
सॅमसंग ब्रँडच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर या सेलमध्ये 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंटची ऑफर आहे. याशिवाय अ‍ॅपलच्या iPhone 11 आणि iPhone 8 Plus वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये वनप्लसच्या डिव्हाइसेसवर 4,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल, तर Xiaomi च्या स्मार्टफोन्सवर 7,000 रुपयांपर्यंत बचत होईल. Samsung च्या गॅलेक्सी एम सीरिजचे फोन 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयच्या पर्यायासह खरेदी करता येतील. याशिवाय सॅमसंगचे प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. जुना फोन एक्स्चेंज केल्यास 4,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट आहे. Apple च्या iPhone 11 आणि iPhone 8 Plus यांसारख्या हँडसेटवर 10,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. तर, Oppo ब्रँडच्या स्मार्टफोनवर 14,000 रुपयांपर्यंत आणि Vivo च्या डिव्हाइसेवर 6,000 रुपयांपर्यंत सूट व नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल.

नुकतेच लाँच झालेल्या लेटेस्ट स्मार्टफोनवरही डिस्काउंट:-
Amazon Prime Day सेलमध्ये नुकतेच लाँच झालेले Samsung Galaxy M31s, Redmi 9 Prime, OnePlus Nord, Redmi Note 9 Scarlet Red, Honor 9A, Oppo A51 आणि Tecno Spark 6 Air हे स्मार्टफोनही काही ऑफरसह उपलब्ध असणार आहेत. या सेलमध्ये फोनशिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीजवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. लॅपटॉप, स्मार्टवॉच, स्पीकर्स, टीव्ही यांसारखे अनेक उपकरणं कमी किंमतीत उपलब्ध असतील.