01 October 2020

News Flash

Amazon Prime Day Sale : सॅमसंगपासून अ‍ॅपलपर्यंत, अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट

स्मार्टफोन, टीव्ही, स्पीकर, लॅपटॉप, इअरफोन आणि अन्य अनेक गॅजेट्सवर डिस्काउंट

Amazon Prime Day सेलला 6 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. दोन दिवसांच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट दिलं जात आहे. याशिवाय नुकतेच लाँच झालेले काही स्मार्टफोन सेलमध्ये उपलब्ध होणार आहेत. यात बहुतांश बजेट, मिड-रेंज सेगमेंटमधील स्मार्टफोन, ट्रू वायरलेस ईअरबड्स, स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट वॉचचा समावेश आहे. या सेलमध्ये बँक ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय यांसारखे पर्याय मिळतील. स्मार्टफोन, टीव्ही, स्पीकर, लॅपटॉप, इअरफोन आणि अन्य अनेक गॅजेट्सवर सेलमध्ये डिस्काउंट मिळेल. याशिवाय रेफ्रिजरेटर्स, AC आणि ईको स्मार्ट डिस्प्लेवर 40 टक्के डिस्काउंटची ऑफर आहे.

कंपनीने या सेलसाठी एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली आहे. यानुसार, एचडीएफसी कार्ड आणि ईएमआयवर 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. सॅमसंग ब्रँडच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर या सेलमध्ये 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंटची ऑफर आहे. याशिवाय अ‍ॅपलच्या iPhone 11 आणि iPhone 8 Plus वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये वनप्लसच्या डिव्हाइसेसवर 4,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल, तर Xiaomi च्या स्मार्टफोन्सवर 7,000 रुपयांपर्यंत बचत होईल. Samsung च्या गॅलेक्सी एम सीरिजचे फोन 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयच्या पर्यायासह खरेदी करता येतील. याशिवाय सॅमसंगचे प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. जुना फोन एक्स्चेंज केल्यास 4,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट आहे. Apple च्या iPhone 11 आणि iPhone 8 Plus यांसारख्या हँडसेटवर 10,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. तर, Oppo ब्रँडच्या स्मार्टफोनवर 14,000 रुपयांपर्यंत आणि Vivo च्या डिव्हाइसेवर 6,000 रुपयांपर्यंत सूट व नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल.

Amazon Prime Day सेलमध्ये नुकतेच लाँच झालेले Samsung Galaxy M31s, Redmi 9 Prime, OnePlus Nord, Redmi Note 9 Scarlet Red, Honor 9A, Oppo A51 आणि Tecno Spark 6 Air हे स्मार्टफोनही उपलब्ध असणार आहेत. या सेलमध्ये फोनशिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीजवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल. लॅपटॉप, स्मार्टवॉच, स्पीकर्स, टीव्ही यांसारखे अनेक उपकरणं कमी किंमतीत उपलब्ध असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 8:48 am

Web Title: amazon prime day sale from 6th august check top electronic smartphone deals offers discounts price sas 89
Next Stories
1 पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार ठेवा दूर; अशी घ्या काळजी
2 शरीरावर खाज सुटल्यामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय नक्की करा
3 Google चा ‘स्वस्त’ Pixel 4a झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स
Just Now!
X