News Flash

Amazon Prime Day : 48 तासांसाठी बंपर सेल आणि आकर्षक डिस्काउंट

ऑफरचा फायदा घेण्यासाठी ‘या’ 10 टिप्स

ई-कॉमर्स कंपनी ‘अॅमेझॉन इंडिया’चा Amazon Prime Day Sale आजपासून अर्थात 15 जुलैपासून सुरू होतोय. केवळ 48 तासांसाठीच हा सेल असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, ऑडियो प्रॉडक्ट्स, टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रिक उपकरणांवर बंपर डिस्काउंट ऑफर आहे. अशाप्रकारच्या सेलमध्ये एखादी वस्तू खरेदी करण्याआधीच ती वस्तू अनेकदा ‘आउट ऑफ स्टॉक’ झालेली असते, त्यामुळे ग्राहकांची निराशा होते. हे टाळावं आणि सेलचा योग्यरित्या फायदा घेता यावा यासाठी आम्ही तुम्हाला 10 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

1- सर्वात आकर्षक ऑफर मिळविण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही अॅमेझॉन मोबाइल अॅप डाऊनलोड करावं.
2 -या सेलमध्ये अशा काही ऑफर असतील ज्या केवळ अॅपवर उपलब्ध होतील.
3- अॅप डाऊनलोड केल्यानंतर सेटिंग पर्यायात जाऊन तेथे नोटिफिकेशन्सवर क्लिक करा.
4- नोटिफिकेशन्सवर क्लिक केल्यानंतर ‘पर्सनलाईज्ड नोटिफिकेशन्स’चा पर्याय निवडा. त्यामुळे तुम्हाला तुम्ही शोधलेल्या अथवा खरेदीच्या यादीत टाकलेल्या प्रॉडक्ट्सचे अलर्ट मिळतील.
5- अॅमेझॉन अॅप वापरत नसाल, तर तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर अॅमेझॉन असिस्टंट डाऊनलोड करु शकता.
6- सेलच्या आधीच काही प्रोडक्ट आणि श्रेणींची यादी केली आहे. त्यात तुम्हाला कोणत्या प्रॉडक्टवर किती सवलत मिळणार आहे. ते पाहता येईल.
7 -जी वस्तू खरेदी करायची आहे ती ‘अॅड टु कार्ट’ करुन ठेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला तातडीने ती वस्तू खरेदी करता येईल.
8 -वेळ वाचविण्यासाठी सेल सुरु होण्याआधीच तुम्ही तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्ड/यूपीआयच्या डिटेल्स सेव्ह करुन ठेऊ शकता.
9- या सेलमधील कोणत्याही ऑफरचा लाभ घेण्यासाठी अॅमेझॉन प्राइम मेंबर असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे मेंबरशिप नसेल तर 125 रुपयांमध्ये      तुम्ही 1 महिन्यासाठी मेंबर बनू शकतात. तुम्हाला हवं असेल तर वर्षभरासाठीही मेंबरशिप खरेदी करता येईल.
10 -खरेदीसाठी ‘अॅमेझॉन पे’चा उपयोग केल्यास तुम्हाला अतिरिक्त सुट मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 11:21 am

Web Title: amazon prime day sale know how to avail offers sas 89
Next Stories
1 वयात येताना मुलींना अर्धशिशीचा धोका अधिक
2 क्रॅटोमच्या पूरक औषधांनी आरोग्यावर दुष्परिणाम
3 उपवास करताय? ही काळजी नक्की घ्या
Just Now!
X