28 September 2020

News Flash

64MP कॅमेऱ्यासह तब्बल 6000mAh ची बॅटरी, सॅमसंगच्या शानदार स्मार्टफोनचा ‘सेल’

Non Chinese Smartphone वर आकर्षक ऑफर्स

( फोटो- अ‍ॅमेझॉन )

दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारतात आपला ‘मिड-रेंज सेगमेंट’मधला नवीन स्मार्टफोन लाँच केला. Samsung Galaxy M31s हा गॅलेक्सी एम सीरिजमधला नवीन फोन कंपनीने आणला आहे. 6GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम+128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला असून 19 हजार 499 रुपये आणि 21 हजार 499 रुपये इतकी अनुक्रमे किंमत ठेवण्यात आली आहे. आता भारतात हा फोन खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.  ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर सुरू असलेल्या प्राईम-डे सेलमध्ये हा फोन खरेदी करता येईल. अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलचा आज (दि.7) शेवटचा दिवस आहे.

ऑफर्स :-
अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही ऑफरही आहेत. यानुसार एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर १० टक्के डिस्काउंट मिळेल. जुना फोन एक्स्चेंज केल्यास 11 हजार 200  रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. याशिवाय अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के रिवॉर्ड पॉइंट आणि 5 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच, काही बँकांच्या कार्डवर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.

फीचर्स :-
अँड्रॉइड-10 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित असलेल्या Galaxy M31s मध्ये Exynos 9611 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल क्षमतेचा असेल. कॅमेऱ्यासाठी ‘Intelli-Cam सिंगल टेक’ फीचर देण्यात आलं आहे. याद्वारे एकावेळेस अनेक फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करता येतात असं सांगितलं जात आहे. 64MP प्राइमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सल अल्ट्रा व्हिडिओ सेन्सर, 5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स असा हा कॅमेऱ्यांचा सेटअप असेल. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP चा कॅमेराही देण्यात आला आहे. Samsung Galaxy M31s मध्ये फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आलाआहे. फोनच्या फ्रंट पॅनलमध्ये होल-पंच कटआउट डिझाइन असेल. याशिवाय 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. पॉवरफुल बॅटरीमुळे 125 तासांचा म्युजिक प्ले-बॅक, 51 तासांचा कॉलिंग बॅकअप व 22 तासांचा ब्राउझिंग बॅकअप मिळतो, असा कंपनीचा दावा आहे. यापूर्वी कंपनीने M सीरीजअंतर्गत Samsung Galaxy M30s आणि Samsung Galaxy M31 हे दोन फोन भारतीय बाजारात आणले आहेत.

किंमत :-
6GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम+128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला असून 19 हजार 499 रुपये आणि 21 हजार 499 रुपये इतकी अनुक्रमे किंमत ठेवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 11:07 am

Web Title: amazon prime day special offers samsung galaxy m31s goes on sale sas 89
Next Stories
1 भारताने ‘बॅन’ केलं Mi Browser अ‍ॅप , ‘शाओमी’च्या युजर्सना बसणार फटका
2 पदवीधारकांसाठी मंदीत संधी; मोठ्या पगारावर बँकेत काम करण्याची संधी
3 VIDEO: ऑनलाइन विश्वात हरवलेल्यांची…’गोष्ट बालमनाची’
Just Now!
X