ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनच्या वेबसाइटवर Amazon Wow Salary Days सेलला सुरूवात झाली आहे. एक डिसेंबरपासून सुरू झालेला हा सेल 3 डिसेंबरपर्यंत अर्थात उद्यापर्यंत असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, हेडफोन अशा अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स आहेत, तसेच नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्स्चेंज ऑफरचा पर्यायही आहे.

या सेलमध्ये LG, Sanyo, Voltas,OnePlus, Boat, JBL ब्रँड्सचे प्रोडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. लॅपटॉपच्या खरेदीवर 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयची ऑफर आहे. अमेरिकी कंपनी Avita चा लॅपटॉप 17,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. HP, Dell आणि माइक्रोसॉफ्टच्या लॅपटॉपवर 30 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते. माइक्रोसॉफ्ट सर्फेस लॅपटॉप 3 13.5 इंच मॉडेल या सेलमध्ये 98,999 रुपयांऐवजी 90,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Amazon ने या सेलसाठी बँक ऑफ बडोदासोबत भागीदारी केली आहे. यानुसार, बँक ऑफ बडोदाच्या कार्डवर ईएमआद्वारे खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत इस्टंट डिस्काउंट किंवा 1,500 रुपयांपर्यंत सवलत मिळेल.

सेलमध्ये जाब्रा, बोट, सोनी, जेबीएल आणि अन्य ब्रँड्सच्या हेडफोन्सवर 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतं. याशिवाय बोट, जेबीएल आणि मी साउंडबारवर 30 ट्क्कयांपर्यंत सवलत आहे. कंपनीकडून प्रीमियम हेडफोन्स आणि स्पीकर्सवरही नो-कॉस्ट ईएमआयची ऑफरही आहे. अॅपल एअरपॉड्स प्रो 4 हजार रुपयांच्या सवलतीसह 20,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, सॅमसंग गॅलेक्सी बड्स+ 8,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
या सेलमध्ये फ्रीज किमान 6,490 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. तर, वॉशिंग मशीन 35 टक्क्यांपर्यंत डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. अँड्रॉइड टीव्हीवरही 30 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे.