14 December 2017

News Flash

अॅमेझॉनच्या ‘द ग्रेट इंडियन सेल’मध्ये मोबाईलवर आहेत ‘या’ अनोख्या ऑफर्स

वेळीच लाभ घ्या

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 10, 2017 3:47 PM

पावसाळ्यात मार्केटमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सेलमुळे ग्राहकांची खऱ्या अर्थाने चांदी होते. आता बाजारात जाऊन खरेदी करण्याबरोबरच ऑनलाइन खरेदीकडेही नागरीकांचा कल वाढत चालला आहे. यामध्ये अगदी कपडे, घरातील वस्तू याबरोबरच मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या किंमती वस्तू खरेदी करतानाही ग्राहक दिसत आहेत.

ऑनलाईन खरेदीसाठी आघाडीवर असणाऱ्या अॅमेझॉनचा ‘द ग्रेट इंडियन सेल’ काल म्हणजेच बुधवारपासून सुरु झाला आहे. दोन दिवसांच्या या सेलमध्ये दुसऱ्या दिवसासाठी काही खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट मिळणार आहे. याशिवाय अनेक डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफर्स देण्यात आल्याने ग्राहकांसाठी ही आनंदाची बाब आहे.

३२ जीबीच्या आयफोन ७ वर ६ हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन ४२,९९९ रुपयांना मिळणार आहे. ३२ जीबीचा आयफोन ६ केवळ २३,९९९ रुपयांना मिळणार आहे. वनप्लस ५ वर २ हजार रुपयांचे एक्सचेंज डिस्काऊंट मिळणार आहे. मोटो जी ५ प्लस २००० रुपये डिस्काऊंटनी १४,९९९ रुपयांना मिळेल. याशिवाय पेनड्राईव्हवर ४० टक्के सूट, ब्लूटूथ स्पीकरवर ५० टक्के सूट तर डिस्क ड्राईव्हवर ४० टक्के सूट मिळणार आहे. हा सेल १२ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

First Published on August 10, 2017 3:47 pm

Web Title: amazons sale exciting offers on smartphones and other gadgets