29 October 2020

News Flash

‘लॉकडाउन’दरम्यान WhatsApp च्या मदतीने झाली JioMart ची सुरूवात !

WhatsApp च्या मदतीने पोहोचवणार JioMart च्या सेवा...

काही दिवसांपूर्वीच जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या अंतर्गत फेसबुकने जिओमध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता रिलायन्सने आपले ऑनलाइन इ-कॉमर्स पोर्टल JioMart ची सुरूवात केली आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp द्वारे कंपनीने ही सेवा सुरू केली आहे.

कसा करायचा वापर?-
Reliance Retail च्या JioMart या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मची सेवा सध्या मुंबईच्या काही परिसरात सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण या परिसरातील काही निवडक ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओमार्टच्या सेवेसाठी इच्छुक ग्राहकांना JioMart चा WhatsApp क्रमांक 8850008000 आपल्या फोनच्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह करावा लागेल. या नंबरवर ‘Hi’ असा मेसेज पाठवल्यानंतर ग्राहकांना ऑर्डरसाठी जिओमार्टद्वारे एक लिंक मिळते. ही लिंक ३० मिनिटांसाठी वैध असते. त्यापेक्षा अधिक वेळ लागल्यास पुन्हा मेसेज पाठवावा लागतो. एकदा ऑर्डर केल्यानंतर कंपनी तुमची ऑर्डर एका किराणा दुकानासोबत शेअर करेल. यानंतर ग्राहकांना ऑर्डरबाबत नोटिफिकेशन आणि दुकानाबाबतची सर्व माहिती मिळते.

लॉकडाउनदरम्यान जिओमार्ट आपल्या सेवा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ची मदत घेत आहे. आपल्या इ-कॉमर्स सेवेची चाचणी सुरू करत रिलायन्सने आता Amazon आणि Walmart च्या फ्लिपकार्ट या आघाडीच्या इ-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्याची जोरदार तयारी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2020 2:29 pm

Web Title: amid lockdown jiomart whatsapp based online portal starts sas 89
Next Stories
1 केंद्र सरकार प्रत्येकाला देणार हजार रुपये?; जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजमागील सत्य
2 Video: दारुसाठी कायपण… शेजाऱ्यांनी सुरु केला ‘Social Distancing Bar’
3 Lockdown : ऑनलाइन Ludo खेळताना पत्नीकडून हरला, चिडलेल्या पतीने मारहाण करत पाठीचा कणा तोडला
Just Now!
X