वोडाफोन आयडिया तसेच अनेक सिम कार्ड असलेल्या कंपन्यांनी त्यांचे नवनवीन प्लॅन बाजारात आणतात. अशातच आता रिलायन्स जिओने (Reliance Jio) देखील ग्राहकांसाठी नवीन योजना बाजारात आणली आहे. यात तुम्हाला १४ दिवसांपासून ते ३६५ दिवसांपर्यंत स्वस्त रिचार्ज करता येणार आहे. तर जिओचे अनेक प्लॅन हे तुम्हाला परवडणारे आहेत. हे प्लॅन १२९ रुपयांपासून सुरू होत असून आणि ४९९ रुपयांपर्यंत आहेत. चला तर मग जिओच्या या प्लॅनमुळे युजर्सना कोण-कोणते फायदे होणार आहेत. जाणून घेऊयात.

Jio चा १२९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओचा २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणारा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. १२९ रुपयांचा रिचार्ज हा जिओच्या सुपर व्हॅल्यू असलेला प्लॅनचा हा भाग आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉल करून अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण २ जीबी डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये ३०० (SMS)एसएमएस तुम्ही पाठवू शकता. तसेच जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध करण्यात आले आहे.

१९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओचा १९९ रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा देण्यात आला आहे. म्हणजेच जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण ४२ जीबी डेटा उपलब्ध करण्यात आला आहे. प्लॅनद्वारे  कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅन्स दररोज १०० एसएमएस (SMS)पाठवण्याची सुविधा आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे.

२४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओने आपला २४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन सुपर व्हॅल्यू कॅटिगिरीमध्ये ठेवला आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये एकूण ५६ जीबी डेटा उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये सुद्धा कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच तुम्हाला जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये दररोज १०० (SMS) एसएमएस पाठवण्याच्या सुविधेसह दिले जात आहे.

३४९ आणि ४९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या या दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज ३GB डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये एकूण ८४जीबी डेटा उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० (SMS) पाठवू शकतात. त्याचबरोबर जिओ अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील देण्यात आले आहे. तसेच जिओच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज तुम्हाला ३GB डेटासह ६GB अतिरिक्त डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण ९०GB डेटा उपलब्ध आहे. डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये दररोज १००(SMS) एसएमएस पाठवू शकतात.