उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे ट्विटर अकाऊंटवर लाखो फॉलोवर आणि चाहते आहेत. आनंद महिंद्रा त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर नेहमी नवनवीन ट्विट शेअर करत असतात. त्यांचे लाखो फॉलोवर त्यांची पोस्ट पाहत असतात. अशातच आता त्यांचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल झाले आहे. मात्र  हे ट्विट केल नसून ते फेक ट्विट असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. नेमकी कोणते आहे ते ट्विट पाहुयात.

खोट्या ट्विटचे केला पोलखोल

आनंद महिंद्रा यांच्या नावाने करण्यात आलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे.दरम्यान महिंद्रा यांनी ट्विट करत सांगितले की, मला आनंद आहे की काही लोकांचा विश्वास आहे, की माझी विधाने गांभीर्याने घेतली जाऊ शकतात. मी नेहमी सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी आणि चांगले ज्ञान शेअर करत असतो. त्यावर विश्वास देखील ठेवतो. पण अनेकदा चुकीच्या गोष्टी या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.

शालेय शिक्षणाबद्दल पसरली होती खोटी चर्चा

आनंद महिंद्रा यांनी ट्वीटरवर खोट्या ट्विट बद्दल संगितले. कारण ती खोटी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या खोट्या ट्विट मध्ये असे लिहिले होते की, आनंद महिंद्रा यांनी शालेय शिक्षणात शेअर मार्केट ट्रेडिंग अनिवार्य करण्याचे आवाहन केले. मात्र त्यांनी असे काहीच लिहिले नव्हते. आनंद महिंद्राने या पोस्टवर आणखी दोन मजेदार ट्विट केले आहेत.

जे या ट्विटशी संबंधित आहे.

या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.