News Flash

डॉक्टरांची भन्नाट शक्कल! रुग्णाला ‘बिग बॉस’ दाखवून यशस्वीपणे केली ‘ओपन ब्रेन सर्जरी’

किचकट ओपन ब्रेन सर्जरी करताना रुग्णाचे शस्त्रक्रियेवरून लक्ष हटविण्यासाठी नामी शक्कल...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

एखाद्या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर केवळ गोळ्या-औषधं किंवा तंत्रज्ञानावर अवलंबून राहत नाहीत, तर त्यांना दुसऱ्याही अनेक बाबींची मदत घ्यावी लागते. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी असंच एक ऑपरेशन आंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये केलं. गुंटूर येथील वृंदा न्यूरो सेंटरमध्ये वारा प्रसाद (35) यांच्यावर ओपन ब्रेन सर्जरी करण्यात आली. ही अवघड शस्त्रक्रिया करताना रुग्णाला शुद्धीत ठेवणे गरजेचे होते. त्यासाठी डॉक्टरांनी एक भन्नाट शक्कल लढवली.

ओपन ब्रेन सर्जरी करताना रुग्ण जागा राहावा, जेणेकरुन यशस्वीपणे सर्जरी करता येईल यासाठी डॉक्टरांनी रुग्णाचा आवडता टीव्ही कार्यक्रम बिग बॉस सुरू केला आणि ट्यूमर हटविण्यासाठी शस्त्रक्रिया सुरू केली. डॉक्टरांनुसार त्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान बिग बॉसशिवाय हॉलिवूडचा एक चित्रपटही रुग्णाला दाखवला आणि यशस्वी शस्त्रक्रिया केली. ब्रेन सर्जरी करताना त्या रुग्णाचे शस्त्रक्रियेवरून लक्ष हटविण्यासाठी डॉक्टरांनीच ही बिग बॉसची नामी शक्कल लढविली. बिग बॉस संपल्यानंतर वारा प्रसाद यांना अवतार हा हॉलिवूड चित्रपट दाखविण्यात आला. रुग्ण बिग बॉस व अवतार चित्रपट बघण्यात गुंतला असतानाच डॉक्टर त्याच्यावर सर्जरी करून मोकळे झाले. गुंटूरमधील डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. शेषाद्री शेखर, डॉ. त्रिनाथ यांनी नवीन तंत्रज्ञान आणि मशिनचा वापर करून ही किचकट सर्जरी सोपी केली.

यापूर्वी 2016 मध्येही वारा प्रसाद यांच्यावर ओपन ब्रेन सर्जरी करण्यात आली होती. पण, ती अयशस्वी झाल्याने पुन्हा ही शस्त्रक्रिया गुंटूरमध्ये करण्यात आली. डोक्याचं ऑपरेशन करताना अत्यंत खबरदारी घ्यावी लागते, त्यामुळे यशस्वी झालेली ही किचकट शस्त्रक्रीया चर्चेचा विषय ठरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 1:28 pm

Web Title: andhra pradesh doctors perform brain surgery while showing tv show bigg boss to patient sas 89
Next Stories
1 लवकरच गुगल सांगणार कोण करतंय कॉल, TrueCaller सारख्या फिचरवर सुरू आहे काम
2 कारच्या सेफ्टीवरुन टोमणा मारणाऱ्या टाटा मोटर्सला मारुती सुझुकीने दिलं जबरदस्त प्रत्युत्तर!
3 आता Zoom मिटिंगमध्ये व्यत्यय आणला तर होणार कारवाई, कंपनीने आणलं नवं फिचर
Just Now!
X