स्मार्टफोन वापरणारा देशातील मोठा वर्ग अँड्रॉइड आधारित फोनचा ग्राहक आहे. त्यामुळे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये झालेला किंचित बदल किंवा नवीन अपडेटबाबत वापरकर्त्यांना उत्सुकता असते. तसेच कुतूहल गुगलच्या अँड्रॉइडच्या नवीन आवृत्तीचे आहे. मात्र, गुगलने यंदा भारतीय वापरकर्त्यांचे कुतूहल जास्त न ताणू देता लवकरच त्यांच्या स्मार्टफोनवर ‘अँड्रॉइड पी’चे अपडेट पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात स्मार्टफोनची बाजारपेठ फार मोठी आहे. या बाजारपेठेत चिनी कंपन्यांपासून अमेरिकी कंपन्यांपर्यंत आणि भारतीय कंपन्यांपासून इतर देशांच्या ब्रॅण्डपर्यंत अनेक स्मार्टफोन विक्रीस उपलब्ध आहेत. यापैकी बहुतांश स्मार्टफोन अँड्रॉइडवर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे आहेत. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम निर्माण करणाऱ्या गुगलकडून वेळोवळी या कार्यप्रणालीत बदल केले जातात व तिची नवी आवृत्ती आणली जाते. अशा रीतीने गेल्या काही वर्षांत ‘जिंजरब्रेड’ (अँड्रॉइड २.३) वरून अँड्रॉइडची सध्या आठवी आवृत्ती अर्थात ‘अँड्रॉइड ओरिओ’ बहुतांश स्मार्टफोनवर विराजमान झाली आहे. यातील प्रत्येक आवृत्तीमध्ये आमूलाग्र बदल करत गुगलने वापरकर्त्यांसाठी स्मार्टफोनवर नवनवीन सुविधा आणि अधिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला आहे. या वाटचालीत आता ‘अँड्रॉइड पी’ अर्थात नवव्या आवृत्तीची भर पडत आहे.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर

आतापर्यंत गुगलने अँड्रॉइडच्या नवीन आवृत्त्या आणल्या तेव्हा त्यांची नावे इंग्रजी अद्याक्षराच्या क्रमाने आणि खाद्यपदार्थावरून ठेवण्यात आली. जिंजरब्रेड, हनीकोम्ब(अपवादाम्तक), आइस्क्रीमसँडविच, जेलिबिन, किटकॅट, लॉलिपॉप, मार्शमेलो, नोगट आणि ओरिओ अशा क्रमाने या आवृत्त्या स्मार्टफोनवर येत राहिल्या. त्यात आता ‘अँड्रॉइड पी’ची भर पडणार आहे. तसे पाहता, अद्याप ही ऑपरेटिंग सिस्टीम जगभरात कुठेच सादर झालेली नाही. मात्र, कॅलिफोर्नियामध्ये मंगळवारपासून सुरू झालेल्या गुगलच्या डेव्हलपर्ससाठीच्या परिषदेत (गुगल आय/ओ) ‘अँड्रॉइड पी’ची झलक दाखवण्यात आली. एवढेच नव्हे तर या आवृत्तीचे ‘बिटा व्हर्जन’ (चाचणी आवृत्ती) लवकरच पुरवले जाईल, अशी घोषणाही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा ही आवृत्ती भारतातील स्मार्टफोनवर लवकर मिळेल, अशी शक्यता आहे. एरवी अँड्रॉइडची कोणतीही नवीन आवृत्ती आली की, तिचा शुभारंभ प्रथम गुगलनिर्मित स्मार्टफोनपासून होतो. त्यानंतर पाश्चात्त्य देशांतील नामांकित ब्रॅण्डच्या स्मार्टफोनना ही आवृत्ती पुरवली जाते व नंतर ती भारतात पोहोचते. मात्र यंदा ही ‘बिटा’ आवृत्ती ज्या स्मार्टफोनवर सुरुवातीला पुरवली जाणार आहे. त्यात भारतातील स्मार्टफोनचाही समावेश आहे. सोनी एक्स्पीरिया एक्सझेड२, शॉओमी एमआय मिक्स २ एस, एसेन्शियल पीएच-१, ओप्पो आर१५ प्रो, वनप्लस ६ आणि नोकिया ७ प्लस या स्मार्टफोनवर ही आवृत्ती पुरवण्यात येणार आहे. अर्थात यातील वनप्लस ६ आणि नोकिया ७ प्लस हे दोनच स्मार्टफोन सध्या भारतीय बाजारात उपलब्ध असले तरी, येत्या काळात आणखी स्मार्टफोनवर ‘अँड्रॉइड पी’ येईल यात शंका नाही.

अँड्रॉइड पीमध्ये नवं काय?

१. यूजर इंटरफेस : अँड्रॉइडच्या नवीन आवृत्तीत ‘यूजर इंटरफेस’ अर्थात दर्शनी वापरप्रणालीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यातील प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे ‘नोटिफिकेशन पॅनल’मध्ये नेमकं काय असावं, हे ठरवण्याची पूर्ण मुभा वापरकर्त्यांना देण्यात आला आहे. या पॅनेलमध्ये ‘मॅनेज नोटिफिकेशन’ हा पर्याय असून त्याद्वारे तुम्हाला हव्या त्या गोष्टी निवडता येतील.

२. नेव्हिगेशनमध्ये बदल :  ‘अँड्रॉइड पी’द्वारे गुगलने ‘जेश्चर’ अर्थात हालचालींवर आधारित नेव्हिगेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे केवळ ‘स्वाइप’च्या वेगवेगळय़ा कृतीद्वारे तुम्ही रिसेन्ट अ‍ॅप्स, अ‍ॅप ड्रॉवर हे पर्याय हाताळता येतील.

३. बॅटरीचा कार्यक्षम वापर : नवीन अँड्रॉइड आवृत्तीमध्ये स्मार्टफोनची बॅटरी कोणत्या अ‍ॅप्सना जास्त वापरावी आणि कोणत्या अ‍ॅपना प्रतिबंधित करावी, हे आपोआप ठरवणारी व्यवस्था पाहायला मिळणार आहे. वापरकर्ते ज्या अ‍ॅपचा सातत्याने वापर करतात त्या अ‍ॅपना बॅटरीवापरासाठी प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे फोनचा ‘ब्राइटनेस’ही वापरकर्त्यांच्या गरजेनुसार आपोआप कमी-जास्त होईल.

४. अ‍ॅपचा प्राधान्यक्रम : नवीन आवृत्तीमध्ये तुम्ही जे अ‍ॅप जास्त वापरण्याची शक्यता आहे, ते अ‍ॅप सुरुवातीला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या व्यक्तीशी ठरावीक वेळी नियमितपणे बोलत असाल तर, ‘अ‍ॅप ड्रॉवर’मध्ये तुम्हाला आपोआप त्याबाबतचे ‘नोटिफिकेशन’ दिसेल.

५. झोपेची वेळ : स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे, ही गोष्ट आता जगजाहीर आहे. यामुळे आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होतात व त्याचे खापर स्मार्टफोनवर फुटते. हीच बाब लक्षात ठेवून गुगलने ‘वाइंड  डाऊन’ ही नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेत तुम्ही नोंदवलेल्या वेळेनंतर फोनचा डिस्प्ले आपोआप अंधूक होत जातो. यामुळे वापरकर्त्यांला झोपेच्या वेळेचे भान राहते.

६. नकोसा व्यत्यय टळणार : सध्याच्या स्मार्टफोनमध्ये ‘डू नॉट डिस्टर्ब’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी, त्यावर क्लिक करताच आपला अवघ्या जगाशी संपर्क तुटतो. मात्र, ‘अँड्रॉइड पी’मध्ये ‘श्श..’ हा नवीन पर्याय देण्यात आला असून त्यात तुम्ही ठरावीक मंडळींसाठी तुमचा फोन सुरू व इतरांसाठी बंद ठेवू शकता.