WhatsApp युजर्सना दिलासा देणारं वृत्त आहे. व्हॉटस अ‍ॅप ग्रुपमध्ये कोणालाही अ‍ॅड करायचे असल्यास त्या व्यक्तीची परवानगी असणे आता गरजेचे होणार आहे, जर तुमची परवानगी नसेल तर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. व्हॉट्सने त्याबाबातची पडताळणी सुरू केली आहे. सध्या 2.19.55 व्हर्जनवर हे नवे अपडेट आले आहे. या नव्या अपडेटद्वारे एखाद्याला ग्रुपमध्ये अॅड करायचे असल्यास त्या युजर्सची परवानगी घ्यावी लागणार आहे.

सध्या कोणालाही कोणत्याही ग्रुपमध्ये त्याच्या परवानगीशिवाय अॅड केलं जातं. अनेकांकडून विनापरवानगी कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड केल्याच्या तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. या सर्व तक्रारींची माहिती सरकारी संस्थांनी केंद्र सरकारला दिल्यानंतर मंत्रालयाने व्हॉट्स अॅपला अशाप्रकारचं फिचर आणण्याची सूचना केली होती. सरकारने दिलेल्या सुचनेनंतर व्हॉट्सअपने हे नवे फिचर आणले.

WABetaInfo ने या नव्या अपडेटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हे नवे फिचर फक्त अँड्राईडसाठी असणार आहे. अँड्राइडमध्ये फिचर सुरू झाल्यानंतर लवकच आयफोनसाठीही हे फिचर उपलबद्ध होणार आहे. सेटिंगमध्ये Group नावाचा नवीन पर्याय देण्यात आला आहे. Group वर क्लिक केल्यानंतर आतमध्ये तीन पर्याय असतील. Everyone, My contact आणि Nobody असे तीन पर्याय असतील.