News Flash

सोशल नेटवर्किंग साईट्सवर ‘राग’ प्रभावशाली!

सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून आनंद किंवा दुःखापेक्षा राग व्यक्त करणाऱयांना मोठा प्रतिसाद मिळत असतो.

| September 19, 2013 04:39 am

सोशल नेटवर्किंग साईट्सवर ‘राग’ प्रभावशाली!

सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून आनंद किंवा दुःखापेक्षा राग व्यक्त करणाऱयांना मोठा प्रतिसाद मिळत असतो. राग व्यक्त करणे ही सोशल नेटवर्किंग साईट्सवरील प्रभावशाली भावना असल्याचे संशोधनातून आढळून आले. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या व्यासपीठावर एखाद्या व्यक्तीने राग व्यक्त केल्यास त्याला मोठा प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर त्याची भावना वेगाने इतरत्र पोहोचते, असे चीनमधील विबो या साईटच्या अभ्यासातून स्पष्ट झाले.
चीनमधील बीहॅंग विद्यापीठातील रुई फॅन आणि त्यांच्या सहकाऱयांनी हे संशोधन केले. विबो साईटवर करण्यात येणाऱया विविध ट्विटच्या माध्यमातून व्यक्त होणाऱया भावनांचा इतरांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास या संशोधनातून करण्यात आला. त्यामधून राग ही भावना सर्वाधिक प्रभावशाली असल्याचे आढळून आले. एखाद्या व्यक्तीने या साईटवर आनंद किंवा दुःख व्यक्त केल्यास त्याला जितका प्रतिसाद मिळत नाही, तितका रागाची भावना व्यक्त केल्यास मिळतो, असे संशोधकांना आढळले. सोशल नेटवर्किंग साईट्सवर कोणत्या स्वरुपाच्या भावनांचा वेगाने प्रसार होतो, हे या संशोधनामुळे दिसून आले.
अवघ्या चार वर्षांच्या काळात विबो साईट्वर ५० कोटी युजर्स आले असून, ते दररोज १० कोटी ट्विट करीत असतात. इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे ट्विटर वापरले जाते. त्याचप्रमाणे चीनमध्ये विबो ही साईट वापरली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2013 4:39 am

Web Title: anger most powerful emotion on social media
टॅग : Lifestyle
Next Stories
1 कर्करोग टाळण्यासाठी संत्र्याचा ज्यूस गुणकारी!
2 दीर्घ रजेमुळे कर्मचारी नोकरी बदलण्यास उद्युक्त होतात!
3 आले नवे अ‍ॅप: हॅण्डसेट जोरात हलवा अन् गजर बंद करा!
Just Now!
X