दिगंबर गाडगीळ – response.lokprabha@expressindia.com
अंटार्क्टिका खंड हा अतिशीत प्रदेश आहे. तिथे कायम बर्फ असते. अशा या खंडात एक कधीही न गोठणारे तळे आहे, हे एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. हे तळे सुमारे तीन हजार घन मीटर आकाराचे आहे. हा आकार नेहमी कमी-जास्त होत असतो हेही एक वैशिष्ट्य. त्याची खोली काही इंचांचीच आहे. खरे म्हणजे एवढे उथळ तळे केव्हाच गोठायला पाहिजे, तरी ते गोठत नाही. कारण ते अतिशय खारे आहे. त्यामुळेच तापमान उणे ५० सेल्सिअस अंशापर्यंत पोहोचले तरी ते गोठत नाही.

या तळ्यात इतके क्षार आले कुठून हे एक गूढच होते. ते १९६१ मध्ये तिथे गेलेल्या एका मोहिमेत उलगडले गेले. मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या मते तळ्यातील पाणी खोल भूगर्भातून आलेले असावे. येताना त्याबरोबर ते क्षार घेऊन आले असणार. अशा ठिकाणी पायी जाणे अति कष्टप्रद. तिथे पोहोचवण्याचे काम केले कुशल हेलिकॉप्टर चालकाने. त्यासाठी त्यांना धन्यवाद देण्याकरता शास्त्रज्ञांनी त्या तळ्याचे नामकरण केले ‘डॉन जुऑन तळे.’ डॉन जुऑन हा होता त्यांच्या हेलिकॉप्टरचा वैमानिक.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
China claim on Arunachal Pradesh and its hegemony strategy continues
लेख: चीनचा कावा वेळीच ओळखा..
Antarctica Post Office
भारतीय टपाल विभागाने रचला इतिहास; अंटार्क्टिकामध्ये सुरु केले नवे पोस्ट ऑफिस

त्यानंतर २०१३ साली त्या तळ्यासंबंधात एक प्रबंध प्रसिद्ध झाला होता. त्यात हे क्षार खोलवरून नाही तर उथळ भागातून येतात असे प्रतिपादन केलेले होते. अगदी अलीकडे म्हणजे १५ सप्टेंबर २०१७ च्या ‘अर्थ अ‍ॅण्ड प्लॅनेटरी सायन्स लेटर्स’च्या अंकात या तळ्याचा संगणक मॉडेल आधारे केलेला रासायनिक अभ्यास प्रसिद्ध झाला आहे त्यात पूर्वीचे निष्कर्ष अमान्य केले आहेत.

या खाऱ्या तळ्यातील मीठ आपल्या नेहमीच्या खाण्यातील म्हणजे सोडियम क्लोराइड नसून त्यात ९५ टक्के कॅल्शियम क्लोराइड आहे. ते तेथील पाण्याचा गोठणबिंदू खूप खाली आणते आणि त्यामुळे इथल्या भयानक थंडीतही पाणी द्रवरूपातच राहते. त्या पाण्यातील क्षारांचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. सागराच्या पाण्यातील क्षाराचे प्रमाण साडेतीन टक्के असते. म्हणजे त्या पाण्यापेक्षा हे प्रमाण कित्येक पटींनी अधिक आहे. इतके क्षार विरलेले असल्याने हे पाणी दाट आणि सघन म्हणजे पातळ असते असे या संशोधन तुकडीचे प्रमुख टोनर म्हणतात. हे पाणी इतके खारे होण्यामागे दोन कारणे आहेत. इथल्या मॅकमडरे ड्राय व्हॅलीमधील अतिशय कोरडय़ा वातावरणात बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक असते. शिवाय नेहमीच्या साध्या मिठापेक्षा कॅल्शियम क्लोराइडचे द्रावण अधिक संपृक्त असते. पण इतके मीठ येते कुठून आणि रासायनिक दृष्टीने ते इतके शुद्ध कसे हे अजून गूढच आहे. हे गूढ उकलणे शक्य दिसत नाही. कारण ते तळे ‘संरक्षित’ म्हणून घोषित झालेले आहे. बाह्य़ हस्तक्षेपामुळे तेथील नैसर्गिक परिस्थिती बिघडू नये म्हणून ही व्यवस्था

२०१३ मध्ये टाइम-लेप्स फोटोग्राफीतून, तिथे पाणी कसे येते हे शोधण्यात आले. त्यांच्या मते तळ्याभोवतीच्या जमिनीतील कॅल्शियम क्लोराइड हवेतील बाष्प शोषून घेते. अर्थात हवेतील बाष्पाचे प्रमाण जेवढे उच्च पातळीवर असते (deliquescence) तेव्हाच हे घडत असते. काही पाणी उडून जाते तेव्हा कोरडय़ा झालेल्या जागी मीठ साचून राहते. जेव्हा कधी आजूबाजूचे बर्फ वितळून ते पाणी तळ्यात येते तेव्हा ते मीठही बरोबर आणते. मात्र टोनर यांना हे स्पष्टीकरण मान्य नाही. त्यांच्या मते कुठे तरी भूगर्भातील पाणी साठय़ाशी हे तळे जोडलेले आहे, तिथून तळ्यात पाणी येत असावे, जसे ते याच खंडातील अन्य जलाशयांमध्ये येत असते. पण हे जलाशय या तळ्याइतके खारे नाहीत.

टोनरचा चमू त्या तळ्याभोवतीच्या जमिनीच्या परीक्षणासाठी पुन्हा जाणार होता. त्यांच्या निरीक्षणातून आणि परीक्षणातून त्या तळ्यातील पाण्यात कॅल्शियम क्लोराइड कुठून येते आणि पाणीही भूगर्भ साठय़ातून येते का हे कळले असण्याची शक्यता आहे.

या तळ्यासभोवतालच्या भूभागाचे मंगळावरच्या भूभागाशी साधम्र्य असल्याने त्या संशोधनातून मंगळावरच्या परिस्थितीचा अंदाज येण्याच्या शक्यतेतून अंटार्क्टिकावरील तळ्याला महत्त्व आहे.
सौजन्य – लोकप्रभा