जसे जसे वय वाढत जाते, तसे तसे आपले शरीर कमजोर होत जाते. वृद्धत्वात तर स्नायू व मांसपेशी कमकुवत झालेल्या असतात आणि अशक्तपणा आलेला असतो. पण जर सफरचंद आणि हिरव्या टोमॅटोंचे नियमित सेवन केले तर वृद्धपणी होणाऱ्या विकारांवर तुम्ही मात करू शकता. या फळांच्या सेवनाने शरीर बळकट राहते आणि वय वाढले तरी शरीर कमजोर होत नाही, असा दावा अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे.
लोवा विद्यापीठाच्या या संशोधकांनी ‘वृद्धत्व आणि आजार’ यासंदर्भात संशोधन केले. वाढत्या वयाबरोबर शारीरिक बळ आणि स्नायूंचा क्षय होतो. याचे मुख्य कारण शरीरात असलेले ‘एटीएफ४’ नावाचे प्रथिन. या प्रथिनांचा अतिरेक शरीरासाठी अनावश्यक असतो. ‘एटीएफ४’मुळे स्नायूंमधील प्रथिनांचे संकलन, शारीरिक बळ आणि स्नायूंचे आकारमान कमी करत असतो. वृद्धत्वात ‘एटीएफ४’मुळेच शरीर कमजोर बनते, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले. ‘एटीएफ४’चे कार्य कमी करण्याची क्षमता दोनच फळांमध्ये आहे. एक सफरचंद आणि दुसरे हिरवे टोमॅटो. ही फळे नियमित खाल्ल्यास स्नायू बळकट राहतात आणि वृद्धपणीही शरीर कमजोर होण्याचा धोका कमी असतो, अशीोमहिती ख्रिस्तोपर अ‍ॅडम्स यांनी दिली. अ‍ॅडम्स हे लोवा विद्यापीठात औषधशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू आहे.

सफरचंदाच्या सालीमध्ये उरसोलिक आम्ल असते, त्याचबरोबर हिरव्या टोमॅटोमध्ये टोमॅटिडाइन असते. स्नायूंचा क्षय होण्यापासून रोखण्यासाठी त्यांची मदत होते. त्यामुळे सफरचंद आणि हिरवे टोमॅटो यांचे सेवन करणे गरजेचे आहे. वृद्धपणी येणारा शारीरिक कमकुवतपणा आणि स्नायूंचा क्षय टाळण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे.
– ख्रिस्तोपर अ‍ॅडम्स, संशोधक.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स