News Flash

फ्लिपकार्टवर Apple Days Sale ला सुरुवात, मिळेल ₹5000 पर्यंत कॅशबॅक

आयफोनशिवाय iPad Pro, AirPods आणि Apple Watch वरही भारी डिस्काउंट...

(संग्रहित छायाचित्र)

फ्लिपकार्टवर Apple कंपनीने एका सेलचं आयोजन केलं आहे. या सेलला 10 जूनपासून सुरूवात झाली असून 12 जूनपर्यंत हा सेल सुरू असेल. तीन दिवसांच्या सेलमध्ये Apple iPhone SE, iPhone XS आणि iPhone 11 सीरिजसह अन्य अनेक मॉडेल्सवर काही आकर्षक ऑफर आहेत.

स्मार्टफोनशिवाय सेलमध्ये iPad Pro, AirPods आणि Apple Watch सीरिजवरही ऑफर आहे. या सेलमध्ये HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड युजर्ससाठी स्पेशल ऑफर आहे. एचडीएफसीच्या ग्राहकांना आयफोन मॉडेल्स खरेदी केल्यास कॅशबॅकची ऑफर आहे. याशिवाय जुने आयफोन मॉडेल्सही या सेलमध्ये सवलतीच्या किंमतीसह खरेदी करता येणार आहेत.

काय आहे ऑफर :-
या सेलमध्ये नुकताच लाँच झालेल्या iPhone SE ची किंमत 42,500 रुपये असून या फोनवर 3,600 रुपये कॅशबॅक मिळत आहे. त्यामुळे नवीन iPhone SE सेलमध्ये 38,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच, या फोनच्या खरेदीवर इएमआयचा पर्यायही आहे. तर, एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max वर देखील 5,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. याशिवाय लोकप्रिय iPhone XR ची किंमत 52,500 रुपये आहे. पण हा फोनही सेलमध्ये 4,000 रुपयांच्या कॅशबॅकमुळे 48,500 रुपयांमध्ये करेदी करता येईल. तसेच, जुने iPhone 7 आणि iPhone 7 Plus मॉडेल्स (32 जीबी बेस व्हेरिअंट) 28,499 रुपयांच्या बेसिक किंमतीसह खरेदी करता येतील. iPhone XS ( 64 जीबी व्हेरिअंट) सारख्या प्रीमियम मॉडेल्ससाठी 59,999 रुपये खर्च करावे लागतील. तर, iPhone 8 (64GB) 37,999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 2:32 pm

Web Title: apple days sale on flipkart get best deals on iphone se iphone 11 series and more sas 89
Next Stories
1 भारतात मागणी वाढली; ओप्पो, शाओमी चीनमधून स्मार्टफोन आयात करणार
2 चेहऱ्यावर येणाऱ्या ‘त्या’ काळ्या डागावरील उपाय
3 घरचा वैद्य : जखमेचे काळे डाग घालवण्याच्या सोप्या पद्धती
Just Now!
X