जर तुम्ही अ‍ॅपल आयफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर अॅपल डेज सेल (Apple Days sale) सुरू झाला आहे. 22 ऑगस्टपासून या सेलला सुरूवात झाली असून 25 ऑगस्टपर्यंत सेल सुरू असेल. सेलमध्ये आयफोन स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. एप्रिल महिन्यात लाँच झालेला iPhone SE (2020) स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत सेलमध्ये उपलब्ध आहे.

iPhone SE (2020) 35 हजार 999 रुपये :-
सेलमध्ये अ‍ॅपल आयफोन SE फोन 35 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 64 जीबी मॉडेलची ही किंमत आहे. तर, 128 जीबी मॉडेल 40 हजार 999 रुपये आणि 256 जीबी मॉडेल 50 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. लाँचिंगवेळी या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 42 हजार 500 रुपये, 47 हजार 800 रुपये आणि 58 हजार 300 रुपये होती. या फोनवर 13 हजार 450 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफरही आहे.

35 हजार 999 रुपयांमध्ये iPhone XR :-
iPhone XR हा फोन सेलमध्ये 45 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 64 जीबी मॉडेलची ही किंमत आहे. तर, 128 जीबी मॉडेल 51 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनवरही 13 हजार 450 रुपयांपर्यंत एक्स्चेंज ऑफर मिळेल.

iPhone 11 वर 5 हजार रुपये सवलत :-
सेलमध्ये iPhone 11 स्मार्टफोनवर 5 हजार रुपये सवलत मिळू शकते. पण ही ऑफर केवळ HDFC बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरच लागू आहे. डिस्काउंटमुळे हा फोन (64 जीबी मॉडेल) 63 हजार 300 रुपयांमध्ये आणि 128 जीबी मॉडेल 68 हजार 600 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.