17 October 2019

News Flash

Apple Event 2018 :’टिक टिक वाजते’… आता घड्याळाने मोजा हृदयाचे ठोके

Apple iPhone Launch Event September 2018 : या घड्याळाद्वारे हृदयाचे ठोके मोजता येणार आहेत!

Apple iPhone Launch Event September 2018 : अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी यांनी बुधवारी रात्री साडे अकरा वाजता अॅपलच्या तीन आयफोनसह अॅपल वॉच सीरिज – ४चे अनावरण केले. या घडाळाची किंमत 399 डॉलर(२८, ६८७रूपये) ते 499 डॉलर(३५८६९ रुपये) पर्यंत असेल. अॅपल वॉच-4ची विक्री १४ सप्टेंबरपासून १६ देशांमध्ये सुरू होणार आहे. परंतु या १६ देशांच्या यादीत भारताचं नाव नाही. त्यायमुळे भारतीयांना या घडाळाची वाट पाहावी लागणार आहे. या

अॅपल वॉच सीरिज – ४ची  बॅटरी चार ते १८ तास असेल असा दावा कंपनीने केला आहे. तर या घडाळाची स्क्रीन आधीच्या अॅपल वॉचपेक्षा ३० टक्के मोठी असणार आहे. अॅपल वॉच सीरिज – ४ तीन रंगामध्ये उपलबद्ध असणार आहे. तसेच या वॉचमध्ये ईसीजीची सुविधा असणार आहे. ही वॉच ६४-बिट ड्युल कोर प्रोसेसर असणार आहे . यामध्ये चार नवीन माईक आणि स्पिकरशिवाय अकेन पर्याय देण्यात आले आहेत. या वॉचची साईज ४४ एमएम आहे.

 

सर्वात महत्वाचे म्हणजे या वॉचमध्ये एक नवे फिचर जोडण्यात आले आहे. जर हे वॉच तुमच्यया हातात असेल आणि आपण पडत असाल तर याफोनमधील तात्काळ क्रमांकावर फोन जाईल आपण पडत आहात. सर्वात महत्वाचे म्हणजे, या घडाळात तीन हार्ट फिचर देण्यात आले आहेत. यामध्ये लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी असे तीन हार्ट फिचर आहेत. म्हणजेच या घड्याळाद्वारे हृदयाचे ठोके मोजता येणार आहेत!

अॅपलच्या घडय़ाळाचे जीपीएस व्हर्जन ३९९ डॉलर तर सेल्युलर व्हर्जन ४९९ डॉलरना विकत घेता येईल. नव्या घडय़ाळांच्या घोषणेसोबत आधीच्या म्हणजेच सिरीज-३ मधील घडय़ाळांच्या किंमती कमी केल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या घडय़ाळांची किंमत सुमारे शंभर डॉलरनी कमी होऊ शकेल. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सुमारे २८ हजार रुपयांना मिळणारी घडय़ाळे आता २० हजार रुपयांपर्यंत ग्राहकांना उपलब्ध होऊ शकतील.

आयफोन X च्या प्रचंड यशानंतर अॅपलने आज झालेल्या मेगा इव्हेंटमध्ये आयफोन Xs, आयफोन Xs Max आणि आयफोन Xr असे तीन आयफोन लॉन्च केले आहेत. कॅलिफोर्नियातील अ‍ॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स सभागृहामध्ये नवीन आयफोनचे अनावरण करण्यात आले.

‘अॅपल’च्या इव्हेंटपूर्वी काही वेळासाठी वेबसाईट डाऊन झाली होती.  माध्यमांच्या वृत्तानुसार नवीन डिवाईसची माहिती अपडेट करण्यासाठी वेबसाईटमध्ये काही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही वेळासाठी वेबसाईट डाऊन झाली होती.  ‘Be right back’ असा मेसेज वेबसाईटवर येत होता. याशिवायय अॅपलचा लाईव्ह इव्हेंट सुरू होण्याआधीच YouTube वर फेक ट्रेंडिग सुरू झाले होते. यामध्ये  Apple iPhone Event नावाचा एक चॅनलद्वारे फेक व्हिडीओ दाखवण्यात आला होता.

 

First Published on September 13, 2018 1:52 am

Web Title: apple event 2018 apple watch series 4 unveiled know features and price