Apple September Event 2018  : अँड्रॉईडमध्ये ड्युएल सिमकार्डची सुविधा आल्यानंतर अनेकजण अॅपलकडून इतर कंपन्यांकडे वळले. मात्र आता या सगळ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅपल कंपनीने आपल्या नव्या आयफोनमध्ये ड्यूअल सिमची सुविधा दिली आहे. याआधीही बऱ्याचदा अॅपल आपल्या नवीन मॉडेलमध्ये ड्युएल सिमची सुविधा देणार अशी चर्चा होती, मात्र आता ते प्रत्यक्षात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी रात्री साडे दहा वाजता कॅलिफॉर्नियातील अ‍ॅपलच्या स्टिव्ह जॉब्स सभागृहामध्ये तीन नवीन आयफोनचे अनावरण करण्यात आले. यावेळी दोन आयफोनला ड्यूअल सिमची सुविधा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे iPhone Xs आणि iPhone Xs Max या आयफोनमध्ये ड्यूअल सिम असल्याची घोषणा केली आहे. आयफोनमध्ये पहिल्यांदाच ड्यूअल सिमची सुविधा देण्यात आल्यामुळं ग्राहकांमध्ये या आयफोनबद्दल फारच उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

अॅपलने घोषणा केलेला नवा मोबाइल आयफोन टेन-एसचा डिस्प्ले ५.८ इंच असेल. या शिवाय फेस आयडी, ५१२ जीबीचे स्टोअरेज, आयओएस – १२ प्रोसेसर ही या फोनची वैशिष्ट्ये असतील. आयफोन टेन-एस मॅक्सचा स्क्रीन ६.५ इंची असेल

iPhone Xs हा आ हा iPhone Xचा अपग्रेडेड आयफोन आहे. तर iPhone Xs Max हा आयफोन एक्सएस पेक्षा एक पाऊल पुढे आहे. iPhone Xs आणि iPhone Xs Max हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान आयफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे आयफोन पहिल्या आयफोनपेक्षा ३० टक्के आधीक वेगवान आहेत. या दोन्ही नव्या आयफोनमध्ये A12 बायोनिक चिप देण्यात आली आहे. त्यामुळे Animoji, फोटोज आणि पोट्रेट मोडमध्ये अमुलाग्र बदल करू शकतो.

ड्यूअल सिम आयफोनमुळे भारतात अॅपलचा मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण २ टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे म्हणणे आहे. ‘केजीआय सिक्युरीटीज’ या तैवानमधील अग्रगण्य कंपनीतील तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध तज्ञ मिंग-ची कुओ यांनी लिहीलेल्या एक ब्लॉगमध्ये २०१८पासून येणाऱ्या सर्व आयफोनच्या मॉडेलमध्ये ड्युएल सिम सपोर्ट असल्याचे नमूद केले होते. विशेष म्हणजे या आयफोनमधील देन्ही सिम स्लॉट हे ‘एलटीई’ प्रकारातील असतील. सध्या बाजारात उपलब्ध असलेले सर्व ड्युएल सिम फोन हे ‘एलटीई’ आणि ‘थ्री जी’ प्रकारातले आहेत. ‘एलटीई’ म्हणजे फोरजी आणि त्यावरील तंत्रज्ञान असणाऱ्या सीम कार्डवर चालणारे फोन. ‘२०१८ मध्ये बाजारात येणाऱ्या आयफोनमध्ये ‘एलटीई’ ट्रान्समिशन स्पीडबरोबरच ड्युएल स्टॅण्डबाय फिचरही उपलब्ध होईल. ‘एलटीई-थ्री जी’ऐवजी या फोनमध्ये ‘एलटीई-एलटीई’ तंत्रज्ञान असेल, असा उल्लेख कुवोंनी त्यांच्या लेखात केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple event 2018 iphone xs iphone xs max with dual sim support launched
First published on: 13-09-2018 at 02:20 IST