12 November 2018

News Flash

Apple Event 2018 highlights : आयफोन Xs सह अॅपलचे तीन नवे फोन लाँच

Apple iPhone Launch Event September 2018 : मेगा इव्हेंटमधील क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट वाचा....

Apple iPhone Xs, iPhone Xs Max and iPhone Xr Launch Event

Apple September Event 2018 Live Updates : टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अ‍ॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं. असाच एक खास इव्हेंट अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पार पडला. आयफोन X च्या प्रचंड यशानंतर अॅपलने आज आयफोन Xs, आयफोन Xs Max आणि आयफोन Xr असे तीन आयफोन अॅपल कंपनीने लाँच केले आहेत. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी या फोनचे लाँन्चिग केले. कॅलिफॉर्नियातील अ‍ॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स सभागृहामध्ये नवीन आयफोनचे अनावरण करण्यात आले. तीन नव्या आयफोनसह अॅपलची वॉच सीरिज ४ ही लाँच करण्यात आली आहे. नव्या अॅपल वॉच ४ मध्ये तीन नवे ‘हार्ट फिचर’ दिले गेले आहेत. लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी अशी ही तीन वैशिष्ट्ये आहेत. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅपल कंपनीने यावर्षी नवे फिचर आणि बरेच काही दिले आहे. यामध्ये ड्युल सिमची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता  भारतात अॅपल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण २ टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे मत आहे. काल बुधावारी रात्री साडेदहा वाजता झालेल्या मेगा इव्हेंटमधील क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट वाचा….

Live Blog

Apple Keynote Event 2018 Live Streaming, Apple iPhone XS, iPhone XR, iPhone XS Max Plus, iPad Pro, Apple Watch Series 4 Launch Live Updates:

Highlights

  • 00:16 (IST)

    आयफोन Xrची किंमत ५३८५० रूपयांपासून सुरू

    आयफोन Xrला 3D टच फीचर दिले नाही. पण या फोनला haptic टच देण्यात आला आहे. हा फोन ६.१ इंच असणार आहे. हा आयफोन किंमत ५३८५० रूपयांमध्ये मिळणार आहे. 

  • 23:59 (IST)

    आता आयफोनमध्ये दोन सिमकार्ड वापर करता येणार

    अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे iPhone Xs आणि iPhone Xs Max या आयफोनमध्ये ड्युएल सिम असल्याची घोषणा केली आहे.  याआधीही बऱ्याचदा अॅपल आपल्या नवीन मॉडेलमध्ये ड्युएल सिमची सुविधा देणार अशी चर्चा होती, मात्र आता ते प्रत्यक्षात आले आहे.

  • 23:46 (IST)

    सर्वात वेगवान आयफोन

    iPhone Xs हा आ हा iPhone Xचा अपग्रेडेड आयफोन आहे. तर iPhone Xs Max हा आयफोन एक्सएस पेक्षा एक पाऊल पुढे आहे. iPhone Xs आणि iPhone Xs Max हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान आयफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे आयफोन पहिल्या आयफोनपेक्षा ३० टक्के आधीक वेगवान आहेत.   या दोन्ही नव्या आयफोनमध्ये  A12 बायोनिक चिप देण्यात आली आहे. त्यामुळे Animoji, फोटोज आणि पोट्रेट मोडमध्ये अमुलाग्र बदल करू शकतो. 

  • 23:04 (IST)

    काय आहे खास Apple Watch Series ४ मध्ये

    Apple Watch Series ४ची स्क्रीन आधीच्या अॅपल वॉचपेक्षा ३० टक्के मोठी असणार आहे. तसेच या वॉचमध्ये ईसीजीची सुविधा असणार आहे. ही वॉच ६४-बिट ड्युल कोर प्रोसेसर असणार आहे . यामध्ये चार नवीन माईक आणि स्पिकरशिवाय अकेन पर्याय देण्यात आले आहेत. या वॉचची साईज ४४ एमएम आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वॉचमध्ये एक नवे फिचर जोडण्यात आले आहे. जर हे वॉच तुमच्यया हातात असेल आणि आपण पडत असाल तर याफोनमधील तात्काळ क्रमांकावर फोन जाईल आपण पडत आहात.Summary of the new Apple Watch #appleevent pic.twitter.com/0EG0CJEpD8— Adrian Weckler (@adrianweckler) September 12, 2018

  • 22:40 (IST)

    अॅपल वॉच लाँच

    टीम कूक यांनी मेगा इव्हेंटमध्ये प्रथम अॅपल वॉच लाँच केली आहे. प्रथम क्रमांकाची स्मार्टवॉच असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.  First up: Apple Watch. Cook says it’s the bestselling single watch model in the world (still no sales figs, though). #AppleEvent2018 pic.twitter.com/rvHc4waeaz— David Pogue (@Pogue) September 12, 2018

  • 22:29 (IST)

    ‘अॅपल’च्या मेगा इव्हेंटला सुरूवात

    ‘अॅपल’च्या मेगा इव्हेंटला सुरूवात झाली आहे. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचे कॅलिफोर्नियातील कुपेरटिनो येथील अ‍ॅपल कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आगमन झाले आहे.  

  • 20:59 (IST)

    ‘अॅपल’ची वेबसाईट डाऊन

    ‘अॅपल’च्या इव्हेंटपूर्वी काही वेळासाठी वेबसाईट डाऊन झाली आहे.  माध्यमांच्या वृत्तानुसार नवीन डिवाईसची माहिती अपडेट करण्यासाठी वेबसाईटमध्ये काही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही वेळासाठी वेबसाईट डाऊन झाली आहे.  'Be right back' असा मेसेज वेबसाईटवर येत आहे. थोड्यावेळात वेबसाईट पुर्वरत होऊ शकते.

  • 20:55 (IST)

    मेगा इव्हेंटमध्ये काय काय लाँच होणार?

    एकाच वेळी तीन आयफोन, मॅकबुक एअर-२, अ‍ॅपल वॉच-४, एअरपॉड-२, नव्या फेस-आयडी या तंत्रज्ञानासह आयपॅड आणले जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे हे आयफोन डय़ुएल सिम सुविधेसह येत आहेत.तीनही आयफोनचे डिस्प्ले मोठे असतील. यात ५.८ इंच आयफोन एक्सएस, ६.१ इंच आयफोन एक्ससीसोबतच, ६.५ इंच आयफोन एक्सएस मॅक्स किंवा प्लस या नावाने हे आयफोन आणले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आयपॅड प्रो १२.९ ची या सालातील नवी आवृत्ती येत आहे. 

00:31 (IST) 13 Sep 2018
आयफोन एक्सआरची विक्री १९ ऑक्टोबरपासून

आयफोन एक्सआरची विक्री १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या आयफोनची बॅटरी आयफोन ८ पेक्षा दीड तास आधिक चालेल असा दावा कंपनीने केला आहे.  हा फोन ६.१ इंच आहे. या आयफोनची किंमत ५३८५० रूपयांपासून सुरू होणार आहे.  

00:21 (IST) 13 Sep 2018
आतापर्यंतचा सर्वात महागडा आयफोन

१४३७१९ रुपयापासून आयफोन एक्सएसची किंमत सुरू...आतापर्यंतचा सर्वात महागडा आयफोन

00:16 (IST) 13 Sep 2018
आयफोन Xrची किंमत ५३८५० रूपयांपासून सुरू

आयफोन Xrला 3D टच फीचर दिले नाही. पण या फोनला haptic टच देण्यात आला आहे. हा फोन ६.१ इंच असणार आहे. हा आयफोन किंमत ५३८५० रूपयांमध्ये मिळणार आहे. 

00:09 (IST) 13 Sep 2018
iPhone Xs आणि iPhone Xs Maxचे सेन्सर्स OIS

iPhone Xs आणि iPhone Xs Max ला समोरील कॅमेरा सात मेगापिक्सल असेल. दोन्ही आयफोनला ड्युल रियर कॅमेरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यापैकी एक वाइड अँगल सेन्सर तर दुसरा टेलिफोटो लेन्स असणार आहे. दोन्हीचे सेन्सर्स OIS (ऑप्टिकल इमेज स्टेबलायजेशन)असणार आहेत

00:02 (IST) 13 Sep 2018
आयफोन Xr लाँच

वेगवेगळ्या रंगामध्ये मिळणार आयफोन एक्स आर Apple announces the iPhone Xr available in multiple colors. https://t.co/CmWtKGW76f #AppleEvent pic.twitter.com/2aTTNRH1vh— Inverse (@inversedotcom) September 12, 2018

23:59 (IST) 12 Sep 2018
आता आयफोनमध्ये दोन सिमकार्ड वापर करता येणार

अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे iPhone Xs आणि iPhone Xs Max या आयफोनमध्ये ड्युएल सिम असल्याची घोषणा केली आहे.  याआधीही बऱ्याचदा अॅपल आपल्या नवीन मॉडेलमध्ये ड्युएल सिमची सुविधा देणार अशी चर्चा होती, मात्र आता ते प्रत्यक्षात आले आहे.

23:46 (IST) 12 Sep 2018
सर्वात वेगवान आयफोन

iPhone Xs हा आ हा iPhone Xचा अपग्रेडेड आयफोन आहे. तर iPhone Xs Max हा आयफोन एक्सएस पेक्षा एक पाऊल पुढे आहे. iPhone Xs आणि iPhone Xs Max हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान आयफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे आयफोन पहिल्या आयफोनपेक्षा ३० टक्के आधीक वेगवान आहेत.   या दोन्ही नव्या आयफोनमध्ये  A12 बायोनिक चिप देण्यात आली आहे. त्यामुळे Animoji, फोटोज आणि पोट्रेट मोडमध्ये अमुलाग्र बदल करू शकतो. 

23:37 (IST) 12 Sep 2018
3D टच फीचर

iPhone Xs आणि iPhone Xs Max या दोन्ही आयफोनला रेटिना डिस्प्लेसह 3D टच फीचर देण्यात आले आहे. 

23:23 (IST) 12 Sep 2018
iPhone Xs आणि iPhone Xs Max

iPhone Xs ५.८ इंच तर iPhone Xs Max ६.५ इंचचा असणार आहे.  तसेच हे फोन तीन रंगामध्ये उपलब्ध असणार आहे.   The new iPhone is here. Meet the iPhone Xs and the iPhone Xs Max. They come with 5.8 inch and 6.5 inch super retina displays, the latter being the largest display ever in an iPhone. #AppleEvent pic.twitter.com/9f26qZQIuL — WIRED (@WIRED) September 12, 2018

23:19 (IST) 12 Sep 2018
iPhone Xs Max

OLED डिस्प्लेसह या आयफोनची स्क्रीन ६.१ इंच आहे.  

23:12 (IST) 12 Sep 2018
आयफोन १० एस लाँच

#iPhone XS… #AppleEvent2018 @Apple pic.twitter.com/YBYfvHU8E4— Absolute Geeks (@AbsoluteGeeks) September 12, 2018

23:11 (IST) 12 Sep 2018
Apple Watch series 4ची किंमत

Apple Watch series 4ची बॅटरी चार ते १८ तास असेल असा दावा कंपनीने केला आहे. तर या वॉचची किंमत 399 डॉलर(२८, ६८७रूपये) तर 499 डॉलर(३५८६९ रुपये) असेल. Apple Watch २१ सप्टेंबरपासून बाजारात दाखल होणार आहे. 

23:06 (IST) 12 Sep 2018
तीन रंगामध्ये असणार Apple Watch series 4
23:04 (IST) 12 Sep 2018
काय आहे खास Apple Watch Series ४ मध्ये

Apple Watch Series ४ची स्क्रीन आधीच्या अॅपल वॉचपेक्षा ३० टक्के मोठी असणार आहे. तसेच या वॉचमध्ये ईसीजीची सुविधा असणार आहे. ही वॉच ६४-बिट ड्युल कोर प्रोसेसर असणार आहे . यामध्ये चार नवीन माईक आणि स्पिकरशिवाय अकेन पर्याय देण्यात आले आहेत. या वॉचची साईज ४४ एमएम आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वॉचमध्ये एक नवे फिचर जोडण्यात आले आहे. जर हे वॉच तुमच्यया हातात असेल आणि आपण पडत असाल तर याफोनमधील तात्काळ क्रमांकावर फोन जाईल आपण पडत आहात.Summary of the new Apple Watch #appleevent pic.twitter.com/0EG0CJEpD8— Adrian Weckler (@adrianweckler) September 12, 2018

22:47 (IST) 12 Sep 2018
अशी आहे स्मार्ट वॉच

नव्या अॅपल वॉच ४ मध्ये तीन नवे 'हार्ट फिचर' दिले गेले आहेत. लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी अशी ही तीन वैशिष्ट्ये आहेत. म्हणजेच या घड्याळाद्वारे हृदयाचे ठोके मोजता येणार आहेत!

22:44 (IST) 12 Sep 2018
पाहा स्मार्ट वॉचचा व्हिडीओ

Apple Watch no1 smartwatch and watch in the world. Introducing the next gen Apple Watch #AppleEvent pic.twitter.com/mAQyjSQpNA— Macworld (@macworld) September 12, 2018

22:40 (IST) 12 Sep 2018
अॅपल वॉच लाँच

टीम कूक यांनी मेगा इव्हेंटमध्ये प्रथम अॅपल वॉच लाँच केली आहे. प्रथम क्रमांकाची स्मार्टवॉच असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.  First up: Apple Watch. Cook says it’s the bestselling single watch model in the world (still no sales figs, though). #AppleEvent2018 pic.twitter.com/rvHc4waeaz— David Pogue (@Pogue) September 12, 2018

22:29 (IST) 12 Sep 2018
‘अॅपल’च्या मेगा इव्हेंटला सुरूवात

‘अॅपल’च्या मेगा इव्हेंटला सुरूवात झाली आहे. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचे कॅलिफोर्नियातील कुपेरटिनो येथील अ‍ॅपल कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आगमन झाले आहे.  

22:18 (IST) 12 Sep 2018
YouTube वर फेक ट्रेंडिग सुरू

अॅपलचा लाईव्ह इव्हेंट सुरू होण्याआधीच YouTube वर फेक ट्रेंडिग सुरू झाले आहे. यामध्ये  Apple iPhone Event नावाने एक चॅनल सुरू आहे. यामध्ये एक फेक व्हिडीओ दाखवण्यात आला आहे.

 
22:03 (IST) 12 Sep 2018
थोड्याच वेळात सुरू होणार इव्हेंट
21:41 (IST) 12 Sep 2018
या ठिकाणी पाहा लाईव्ह इव्हेंट

अॅपलचा मेगा इव्हेंट भारतीय वेळेनुसार आज रात्री १० वाजून ३० मिनीटांनी सुरू होणार आहे. iOS10 नुसार अॅपलच्या वेबसाईटवर किंवा https://www.apple.com/apple-events/september-2018/  या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.  

21:34 (IST) 12 Sep 2018
​मॅक्स आणि मॅकबुक्स

आयफोन आणि अॅपल वॉच व्यतिरिक्त कंपनीकडूनआज बुधवारी रेटीना डिस्प्ले सोबत नवे मॅकबुक एयर सुद्धा लाँच केले जाऊ शकतात. याशिवाय इंटेलच्या नव्या ८ जनरेशन प्रोसेसर सोबत नवा आयमॅक्स देखील लाँच होण्याची शक्यता आहे. 

21:33 (IST) 12 Sep 2018
अॅपल वॉच सिरिज ४

या इव्हेंटमध्ये स्मार्टवॉच देखील लाँच केली जाऊ शकते. या घड्याळाच्या डिझाइनमध्ये काही बदल करून यात गोल डायल, ऑलवेज ऑन डिस्प्ले तसेच अधिक रिझॉल्यूशनचे डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही अनोखी भेट ठरणार आहे. 

21:31 (IST) 12 Sep 2018
आयफोनमध्ये फेस आयडी सेन्सर असण्याची शक्यता

अ‍ॅपलची ओळख असलेले फिंगरप्रिंट सेन्सरच्या जागी फेस आयडी सेन्सर असण्याची शक्यता आहे. तसेच अ‍ॅपलमध्ये असणारे प्रोसेसर आणि रॅम हे आधीच्या आयफोनच्या तुलनेत जास्त क्षमतेचे असतील.

21:26 (IST) 12 Sep 2018
अॅपल आयफोन XS लाँच करण्याची शक्यता

यावर्षी अॅपल कंपनी सर्वात लहान स्क्रीनचा अॅपल आयफोन XS लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनची ओलेड स्क्रीन ५.८ इंच असण्याची शक्यता आहे. हा नवा हॅन्डसेट आयफोन X चे अपग्रेड असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये नवीन प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि ड्यूअल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

20:59 (IST) 12 Sep 2018
‘अॅपल’ची वेबसाईट डाऊन

‘अॅपल’च्या इव्हेंटपूर्वी काही वेळासाठी वेबसाईट डाऊन झाली आहे.  माध्यमांच्या वृत्तानुसार नवीन डिवाईसची माहिती अपडेट करण्यासाठी वेबसाईटमध्ये काही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही वेळासाठी वेबसाईट डाऊन झाली आहे.  'Be right back' असा मेसेज वेबसाईटवर येत आहे. थोड्यावेळात वेबसाईट पुर्वरत होऊ शकते.

20:55 (IST) 12 Sep 2018
मेगा इव्हेंटमध्ये काय काय लाँच होणार?

एकाच वेळी तीन आयफोन, मॅकबुक एअर-२, अ‍ॅपल वॉच-४, एअरपॉड-२, नव्या फेस-आयडी या तंत्रज्ञानासह आयपॅड आणले जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे हे आयफोन डय़ुएल सिम सुविधेसह येत आहेत.तीनही आयफोनचे डिस्प्ले मोठे असतील. यात ५.८ इंच आयफोन एक्सएस, ६.१ इंच आयफोन एक्ससीसोबतच, ६.५ इंच आयफोन एक्सएस मॅक्स किंवा प्लस या नावाने हे आयफोन आणले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आयपॅड प्रो १२.९ ची या सालातील नवी आवृत्ती येत आहे. 

20:51 (IST) 12 Sep 2018
आयफोनच्या किंमती समोर

लाँन्चिंगपूर्वीच आयफोनच्या किंमती समोर आल्या आहेत. चीनची वेबसाईट Weibo ने याबाबत वृत्त दिले आहे. Weibo या वेबसाईटनुसार iPhone Xcची सुरूवातीची किंमत ६२१०० रुपये असू शकते. तर iPhone Xsची किंमत ७७,९०० आणि  iPhone Xs प्लसची किंमत ८८,४०० असण्याची शक्यता आहे.

20:45 (IST) 12 Sep 2018
वेगवेगळ्या रंगामध्ये असणार आयफोन

20:43 (IST) 12 Sep 2018
Apple iPhone XS :  ‘अॅपल’च्या वेबसाईटवर नावे लीक

‘अॅपल’च्या वेबसाईटवर आज लाँच होणाऱ्या आयफोनची नावे लीक झाली आहेत. Apple iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR अशी नावे आहेत. 

Apple Keynote Event 2018 Live Streaming, Apple iPhone XS, iPhone XR, iPhone XS Max Plus, iPad Pro, Apple Watch Series 4 Launch Live Updates:

First Published on September 12, 2018 8:26 pm

Web Title: apple event 2018 today live updates apple iphone launch event at steve jobs theater in apple park