आयफोन आणि स्मार्ट वॉचची घोषणा केल्यानंतर आज सोमवार अॅपलकडून नवीन ऑपरेटिंग सिस्टिम आयओएस जारी केले जाणार आहे. भारतामधील आयफोनधारक ऑपरेटिंग सिस्टिम आयओएस १२ आज सोमवारी रात्री १० : ३० वाजाता डाऊनलोड करू शकतात. गेल्या आठवड्यात घेतलेल्या एका पत्रकारपरिषदेमध्ये ऑपरेटिंग सिस्टिम आयओएस १२ जारी केले जाणार असल्याची घोषणा कंपनीने केली होती.

गेल्या आठवड्यात अॅपलने तीन नवीन फोन लाँच केले आहेत. अॅपलचे आयफोन आणि आयपॅडमध्ये आजपासून हे नवीन सिस्टिम डाऊनलोड करून तुम्ही तुमचा आयफोन अपडेट करू शकता. या आयओएस प्रणालीमुळे अॅपल आयफोन आणि मॅक तसचे आय कंप्युटरमध्ये शेअरिंग जलद पद्धतीने होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

आयओएस १२ दोन प्रकारे डाऊनलोड करू शकता. १) सेटिंग > जनरल > सॉफ्टवेअर > डाऊनलोड. २) कॉम्पुटरला आयफोन जोडा आणि आइट्यून्सचा वापर करून सॉफ्टवेअर डाऊनलोड करा

आयओएस १२ फ्री असणार आहे. यासाठी आयफोनकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आयफोन ४ एस, आयफोन ५, आयफोन ५सी, आयफोन ६, आयफोन ६ प्लस, आयफोन ६एस, आयफोन ६ एस प्लस, आयफोन एसइ, आयफोन ७, आयफोन ७ प्लस, आयफोन ८, आयफोन ८ प्लस  आणि आयफओन एक्स यामध्ये अपडेट करू शकता.  

आयओएस १२ अपडेट केल्यास तुमचा आयफोन पहिल्यापेक्षा जलद, स्मूथ आणि वेगवान होईल असा दावा कंपनीने केला आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना कौटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र फाईल शेअर करण्याचा पर्यायही दिला आहे. त्यासे कीबोर्डमध्येही बदल करण्यात आला आहे. फोटो फीचर्समध्ये एडिटींग आणखी जलद आणि चांगले होईल असा दावा कंपनीने केला आहे.