News Flash

Apple ने ‘आयओएस 13’ आवृत्तीची केली घोषणा, जाणून घ्या सर्व फीचर्स

Apple कंपनीने नेक्स्ट-जनरेशन ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केली

‘आयफोन’ आणि ‘आयपॅड’साठी  Apple कंपनीने नेक्स्ट-जनरेशन ऑपरेटिंग सिस्टिम लाँच केली आहे. अ‍ॅपलने आपल्या iOS 13 या नवीन आवृत्तीची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये(WWDC 2019) याबाबत घोषणा केली. यात अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश आहे.

आयफोन 6 एस आणि त्यापुढील आवृत्तीच्या मॉडेल्सला अपडेटच्या स्वरूपात ही प्रणाली लवकरच वापरण्यासाठी मिळणार आहे. याचाच अर्थ आयफोन 5S आणि आयफोन 6 असणाऱ्या ग्राहकांना ही नवी प्रणाली वापरता येणार नाही. आयओएस ऑपरेटींग सिस्टीमच्या तेराव्या आवृत्तीमध्ये आयफोनला अधिक गतीमान आणि लवचीक बनविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

नव्या प्रणालीमुळे आयफोन, आयपॅड आदी उपकरणांचा परफॉर्मन्स अधिक चांगला होईल आणि फेस अनलॉक ही सुविधा आधीपेक्षा 30 टक्के अधिक जलदगतीने काम करेल असा कंपनीला विश्वास आहे. iOS 13 मध्ये डार्क मोड, मॅप्सचे अपडेट, प्रायव्हसी, रिमाईंडरचे अपडेट, नवीन फोटो आणि व्हिडीओ एडीटींग टुल, एक्सटर्नल स्टोरेज, कि-बोर्डवर स्वाईप करण्याची सुविधा असे अनेक फीचर्स आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 11:31 am

Web Title: apple ios 13 launched know all features
Next Stories
1 OnePlus 7 ची आजपासून विक्री सुरू, जाणून घ्या सर्व ऑफर्स
2 Black Shark 2 : ‘शाओमी’चा गेमिंग स्पेशल स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी
3 LG ने आणला जगातील पहिला 8k OLED टिव्ही
Just Now!
X