News Flash

अ‍ॅपलकडून ‘आयफोन १२’ची घोषणा : जाणून घ्या फिचर्स आणि भारतातील किंमत

एकूण १२ मॉडेल्सची घोषणा कंपनीने केली

(Image source: EverythingApple Pro, YouTube)

जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील अ‍ॅपल पार्क येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आयफोन १२ ची घोषणा केली. या कार्यक्रमामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी सुरुवातील मागील अ‍ॅपल इव्हेंटची आठवण करुन दिली. त्यानंतर त्यांनी होम पॉड मिनी स्मार्ट स्पीकर्सची घोषणा केली. स्पीकर्ससंदर्भात घोषणा करुन झाल्यानंतर टिम यांनी आयफोन १२ ची अधिकृत घोषणा केली. त्यांनी हा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफूल फोन असल्याचा दावा केला आहे. या कार्यक्रमामध्ये ५.४ इंचांपासून ते ६.७ इंचांपर्यंतच्या एकूण १२ मॉडेल्सची घोषणा कंपनीने केली.

असा आहे आयफोन १२

आयफोन १२ हा फाइव्ह जी तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारा फोन असणार आहे. अ‍ॅपलने आयफोन १२ मध्ये सहा रंगांचे पर्याय दिले आहेत. तसेच फोनच्या डिस्प्लेला एचडीआर १० तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. आयफोन १२ हा ड्युएल सीम फोन असणार असून त्यामध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. आयफोनचे दुसरे सीम ई-सीम असेल असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. अ‍ॅपलच्या या फोनमध्ये ए-१४ बायोनिक प्रोसेसर असणार आहे. कॅमेरामध्ये अल्ट्राव्हाइड मोड, नाइट मोडसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. सर्वच व्हेरिएंटमध्ये नाइट मोड फिचर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. नाइट मोडमध्येही टाइम लॅप्ससारखे फिचर असल्याने युझर्सला फोटो काढणे अधिक सोप्पे होणार आहे. याचबरोबर फोनमध्ये ५० व्हॅटपर्यंत वायरलेस फास्ट चार्जिंगची सोय आहे. वायरलेस चार्जिंगमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आयफोन १२ मध्ये मैगसेफ तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. आयफोन १२ आणि अ‍ॅपल वॉच एकाच चार्जरने चार्ज करता येईल असंही कंपनीने म्हटलं आहे.

अ‍ॅपलने आयफोन १२ मिनिचीही घोषणा या कार्यक्रमामध्ये केली. या फोनची स्क्रीन ५.४ इंचांची असणार आहे. आयफोन १२ चे सर्व फिचर्स या फोनमध्ये असणार आहे. हा जगातील सर्वात पातळ आणि छोटा फाव्ह जी फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आय़फोन १२ ची किंमत ७९९ डॉलर असणार आहे. तर आयफोन मिनिची किंमत ६९९ डॉलर असेल. अ‍ॅपलने आयफोन १२ मधील सर्वोच्च अशा आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्सचीही ही घोषणा यावेळी केली. या फोनची स्क्रीन ६.७ इंचांची असेल. हा फोन स्टेनलेस स्टील आणि ग्लास बॉडी असणारा असून यामध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय.

सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा, १२ मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्ससारखे फीचर्स आयफोन १२ प्रोमध्ये देण्यात आल्याने त्याला आयपी ६८ मानांकन देण्यात आलं आहे. हा फोन सहा मीटर खोल पाण्यामध्ये अर्ध्या तासापर्यंत राहू शकतो असं कंपनीने म्हटलं आहे. टिम कुक यांनी आयफोन प्रो मॅक्सची किंमती एक हजार ९९ डॉलरपासून सुरु होणार असल्याचे सांगितले. यामध्ये १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोअरेजचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये ६.७ इंचाचां वाइड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. अ‍ॅपलच्या या स्मार्टफोनमध्ये ए-१४ बायोनिक प्रोसेसर देण्यात आला असून यामध्ये आयफोन १२ चे इतर फिचर्सही मिळणार आहेत.

होम पॉड मिनी मध्ये काय आहे?

होम पॉड मिनी हा फॅब्रिकपासून तयार करण्यात आला असून तो मजबुतीच्या बाबतीत इतर कोणत्याही स्पीकर्सपेक्षा उत्तम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आयफोन या स्पीकर्सजवळ नेल्यास तो आपोआप कनेक्ट होईल असं तंत्रज्ञान यामध्ये वापरण्यात आलं आहे. या स्पीकर्समध्ये अ‍ॅपलच्या सिरी या सेवेचाही समावेश आहे. हे स्पीकर्स स्वत: जवळ असणाऱ्या आयफोनशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतील असंही कंपनीने म्हटलं आहे. या स्पीकर्सची किंमत ९९ डॉलर इतकी असून त्याची विक्री ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पांढऱ्या आणि करड्या रंगांमध्ये हे स्पीकर्स उपलब्ध होणार असून भारतात याची किंमत नऊ हजार ९९० रुपये इतकी असणार आहे.

भारतात किंमत किती?

भारतातील किंमत आयफोन १२ मिनिची भारतातील किंमत ६९ हजार ९९० रुपये असून आयफोन १२ ची किंमत ७९ हजार ९०० रुपये असणार आहे. अ‍ॅपलचे हे दोन्ही फोन भारतामध्ये ३० ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील. याचबरोबर आयफोन १२ प्रो भारतात एक लाख १९ हजार ९९०० ला उपलब्ध होईल. तर आयफोन १२ प्रो मॅक्सच्या १२८ जीबी व्हर्जनची किंमत भारतात एक लाख २९ हजार रुपये इतकी अशेल. हे दोन्ही फोन भारतीय बाजारपेठांमध्ये ३० ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 9:51 am

Web Title: apple iphone 12 launch event highlights iphone 12 price in india starts at rs 69900 scsg 91
Next Stories
1 करोनाबाधितांसाठी फिजिओथेरपी
2 कोमट पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?
3 भारतात ‘या’ क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत ९३ हजार ५०० हून अधिक नोकऱ्या; वर्षाला मिळू शकते २५ लाखांचे वेतन
Just Now!
X