News Flash

अॅपल आयफोन ८ चे फीचर्स लिक, सर्वात महागडा फोन ठरण्याची शक्यता?

किंमत ७*, ***/-

अॅपल ब्लॉगर जॉन ग्रुबरने वर्तवलेल्या अंदाजानुसार या फोनची किंमत ही सर्वधिक असणार आहे.

अॅपल आपला आयफोन ८ सप्टेंबर महिन्यात लाँच करणार आहे. हा फोन लाँच होण्यापूर्वीच त्याच्याबद्दल अनेक चर्चा ऐकायल्या मिळाल्या होत्या. अशातच अॅपल आयफोन ८ चे फीचरही लिक झाले असून हा फोन सर्वात महागडा फोन असण्याची चर्चा होत आहे.

अॅपल ब्लॉगर जॉन ग्रुबरने वर्तवलेल्या अंदाजानुसार या फोनची किंमत ही सर्वधिक असणार आहे. या फोनची किंमत जवळपास १२०० डॉलर म्हणजे ७७ हजारांच्या आसपास असेल असा अंदान त्यांनी वर्तवला आहे. तेव्हा जर  आयफोनची ८ ची किंमत ही ७५ हजारांच्या वर असेल तर हा फोन अॅपलने लाँच केलेला आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन ठरेल असंही ते म्हणाले. अॅपल आयफोनला यावर्षी १० वर्षे पूर्ण होत आहे. तेव्हा १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा स्पेशल फोन अॅपल आणणार आहे. काही वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार लाँचिंगच्या वेळी लिमिटेड हँडसेट अॅपल बाजारात आणणार आहे.

-अॅपल आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग असणार आहे.
-यात 3D face recognition तंत्र असण्याची शक्यता आहे, याचा वापर करून युजर्स आपला फोन अनलॉक करू शकतात.
-या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असणार आहे. कॅमेरामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन हे फीचर असेल.
-५.८ इंचाचा ओएलइडी डिस्प्ले असणार आहे. आयफोन ८ सोबत आयफोन ७ चं नवीन अपडेटेड व्हर्जन आयफोन ७ एस देखील सप्टेंबर महिन्यात लाँच होणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 3:54 pm

Web Title: apple iphone 8 feature leaked
Next Stories
1 केस अकाली पांढरे झालेत? ‘हे’ नक्की करुन पाहा
2 १५ ऑगस्टला भीम अॅप वापरल्यास मिळेल अधिक कॅशबॅक?
3 बालुचारी साडीविषयी माहितीये? 
Just Now!
X