Apple च्या फोनबाबत कायमच चर्चा सुरू असते. कायमच अॅपलने प्रिमिअम सेगमेंटमधील अनेक फोन तयार केले आहे. काही दिवसांपासून iPhone 11 आणि iPhone XR2 लाँच होणार असल्याच्या अनेक चर्चा सुरू होत्या. परंतु Apple आता तीन नवे फोन लाँच करणार असल्याचे समोर येत आहे.

9to5Mac ने दिलेल्या माहितीनुसार iPhone 11, iPhone 11 Max आणि iPhone XR2 साठी यूरेशियन डेटाबेसमध्ये मॉडल नंबर्स फाईल केले आहेत. यामधील एक मॉडेल नंबर A21 नव्या iPhone XR2 चा मॉडेल नंबर आहे. हा फोन तीन स्टोरेजच्या ऑप्शनमध्ये मिळणार आहे. iPhone 11 आणि 11 Max साठी A22 मॉडेल नंबर फाईल करण्यात आला आहे.

दरम्यान, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिली नाही. तसेच iPhone चे नवे मॉडेल्स बाजारात कधी येतील याबाबतही माहिती देण्यात आली नाही. नव्या iPhone शी निगडीत अनेक बाबी लिक झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार iPhone मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात येऊ शकतो, असे म्हटले होते.

तसेच Apple चे रिव्ह्यूवर मिंग ची कुओ यांनी iPhone 11 हा मोबाइल 5.8 इंच आणि iPhone 11 Max हा 6.1 इंचाच्या OLED डिस्प्ले देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. यापूर्वी 22 मे रोजी कंपनीने 8 आणि 9 व्या जनरेशनेच्या इंटेल प्रोसेसर असलेल्या MacBook Pro ची नवी रेंज लाँच केली होती. पहिल्यांदाच कंपनीने MacBook मध्ये ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला होता. तसेच हे लॅपटॉप सर्वाधिक गतीचे MacBook Pro लॅपटॉप असल्याचे कंपनीने सांगितले होते. तसेच यामध्ये 6 कोअर MacBook Pro च्या तुलनेत 40 टक्के उत्तम परफॉर्मस मिळणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते.

नव्या MacBook Pro च्या 13 इंचाच्या टचस्क्रीन मॉडेलची सुरूवातीची किंमत 1,59,900 रूपये आहे. तर 15 इंचाच्या व्हेरिअंटची किंमत 1,99,900 रूपये आहे. लवकरच MacBook Pro ची ही नवी रेंज भारतात उपलब्ध होणार आहे.