News Flash

आयफोनच्या नवीन मॉडेलवर मिळणार ७ हजारांपर्यंत भरघोस सूट

आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अतिशय उत्तम संधी आहे

आयफोन हा आजही स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरला जाणारा फोन आहे. अॅपलने नुकतीच आपली आणखी तीन मॉडेल दाखल करत आपल्या ग्राहकांना खुश केले आहे. आता आणखी एक आनंदाची बातमी आहे. अॅपलने आपल्या नवीन मॉडेल्सवर भरघोस सूट जाहीर केली आहे. ही सूट थोडीथोडकी नसून तब्बल ७ हजारांपर्यंत असेल असे सांगण्यात आले आहे. iPhone Xs आणि iPhone Xs Max या दोन्ही फोनबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. हे दोन्ही फोन फ्लिपकार्ट आणि पेटीएमवरून खरेदी करता येऊ शकतात. याशिवाय अॅपल प्रिमियम रिसेलर ऑफिशियल स्टोअर्सवरही हे फोन खरेदी करता येणार आहेत. पेटीएम मॉलवरही या फोनवर भरघोस सूट देण्यात आली आहे. या दोन फोनबरोबरच अॅपलच्या जुन्या मॉडेल्सवरही सूट मिळणार आहे.

जुना आयफोन देऊन या दोन मॉडेलपैकी एक नवीन घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यावर १३,५०० रुपयांची सूट मिळू शकते. याशिवाय पहिल्यांदा मास्टरकार्ड वरुन पहिल्यांदा ऑनलाइन पेमेंट करत असल्यास १० टक्के सूट, एचडीएफसीचे क्रेडिट कार्ड तसेच अॅक्सिस बँकेचे बझ क्रेडिट कार्ड असल्यास आणखी ५ टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांनी iPhone XSआपला फोन ६ ते ८ महिन्यात परत केल्यास त्यांना साधारण ५१,७०० इतकी रक्कम परत मिळू शकणार आहे. तर ९ ते १२ महिन्यांच्या कालावधीत फोन परत करणाऱ्यांना ४६ हजार रुपये परत मिळू शकणार आहेत. पेटीएम मॉलवरही भरघोस सूट मिळणार आहे. एकूणच तुम्ही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम संधी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 12:17 pm

Web Title: apple iphone xs iphone xs max exchange offers deals on flipkart paytm mall and others
Next Stories
1 कर्बोदकांच्या अतिसेवनाने मृत्युदरात वाढ
2 ५ कोटी अकाउंट हॅक, फेसबुकने बंद केले ‘हे’ फिचर
3 World Heart Day : महिलांनाही असतो ह्रदयविकाराचा धोका
Just Now!
X