News Flash

APPLE चा सर्वात स्वस्त iPad लॉंच, 10 तासांचा तगडा बॅटरी बॅकअप

भारतात एप्रिल महिन्यापासून विक्री

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपलने अमेरिकेमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नवा iPad लॉन्च केला आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना केंद्रीत ठेवून या iPad ची निर्मिती करण्यात आली आहे. हा अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त iPad असल्याचंही सांगितलं जात आहे. या iPad मध्ये 9.7 इंचाचा डिस्प्ले असून पेन्सिल सपोर्ट देण्यात आला आहे.

भारतात या iPad ची एप्रिल महिन्यापासून विक्रीला सुरूवात होईल. भारतात याच्या 32जीबी व्हर्जनची किंमत 28 हजार रूपये तर 32 जीबी (वाय-फाय-सेल्यूलर) व्हर्जनची किंमत 38 हजार 600 रूपये असेल. अॅपलच्या पेन्सिलची भारतातील किंमत 7 हजार 600 रूपये असणार आहे. सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड फिनिश कलरमध्ये हा iPad भारतात उपलब्ध होईल.

10 तासांचा तगडा बॅटरी बॅकअप –
iPad मध्ये फेसटाइम फ्रंट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमे-यासोबत A10 फ्यूजन चिप आणि टचआयडी देण्यात आला आहे. iPad ला एलटीई सपोर्ट असून 10 तासांचा बॅटरी बॅकअप असेल असा कंपनीचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 12:48 pm

Web Title: apple launches its most affordable ipad with apple pencil support
Next Stories
1 बॉल टॅम्परिंग म्हणजे नेमकं काय? का करतात बॉल टॅम्परिंग?
2 VIDEO : उच्च दाबाची जलवाहिनी फुटल्यामुळे गाडी चक्क हवेत उडाली
3 निवडणूक तारीख फुटीचं मालवीयांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, पण आयोगाला ‘भरोसा’ नाय!
Just Now!
X