Apple iPhone युजर्ससाठी गुड न्यूज आहे. कंपनी आता जुन्या आयफोन्सना लेटेस्ट ओएस अपडेट देण्याचा विचार करतेय. यामध्ये वर्ष 2015 आणि त्यानंतर लाँच झालेल्या आयफोनचाही समावेश असेल. याशिवाय कंपनी काही जुन्या iPad लाही अपडेट देणार आहे.

काही दिवसांपूर्वीच आलेल्या एका रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी लाँच केलेल्या आणि iOS 13 वर कार्यरत असलेल्या सर्व आयफोन्ससाठी आता iOS 14 उपलब्ध होणार आहे. हे अपडेट iPhone SE, iPhone 7 सीरिजसह अन्य मॉडेल्सलाही मिळेल. याशिवाय वर्ष 2015 मध्ये लाँच केलेल्या 12.9 इंचाच्या iPad Pro आणि वर्ष 2016 व त्यानंतर आलेल्या सर्व iPad लाही अपडेट मिळेल.

WWDC 2020 मध्ये होऊ शकते घोषणा:
iPhoneSoft च्या एका रिपोर्टनुसार, iOS 14 अपडेट iOS 13 वर कार्यरत असलेल्या सर्व डिव्हाइससाठी रोलआउट केले जाईल. मे किंवा जून 2020 मध्ये होणाऱ्या WWDC(वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स)मध्ये याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार वर्ष 2015 मध्ये लाँच झालेल्या आयफोन 6s सीरिजलाही अपडेट मिळेल.

या आयफोन्समध्ये मिळेल iOS 14:
ज्या आयफोन्समध्ये iOS 14 अपडेट मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये आयफोन 11 प्रो मॅक्स, आयफोन 11 प्रो, आयफोन 11, आयफोन XS मॅक्स, आयफोन XS, आयफोन XR, आयफोन X, आयफोन 8 प्लस, आयफोन 8, आयफोन 7 प्लस, आयफोन 7, आयफोन SE, आयफोन 6s प्लस आणि आयफोन 6s समावेश आहे. हे तेच आयफोन आहेत ज्यांना गेल्या वर्षी आयओएस 13 अपडेट मिळाले होते.

आणखी वाचा – चार दिवसांनंतर या मोबाइलमध्ये नाही चालणार WhatsApp, कंपनीने दिली माहिती

या आयपॅड्सना मिळेल लेटेस्ट अपडेट:
आयफोन्सशिवाय कंपनी iPad साठीही लेटेस्ट ओएस अपडेट रिलीज करु शकते. iPadOS 14 ची घोषणाही कंपनी WWDC 2020 मध्ये करेल. अॅपलकडून एकूण 11 iPad ला हे अपडेट दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 12.9 इंच आयपैड प्रो (2015, 2016, 2017), आयपैड प्रो 10.5 इंच, आयपॅड प्रो 9.7 इंच, वर्ष 2018 मध्ये आलेला आयपॅड प्रो 11 इंच, आयपॅड एअर 3, आयपॅड 5, आयपॅड 6, आयपॅड 7 आणि आयपॅड मिनी 5 यांचा समावेश आहे. तर, आयपॅड मिनी 4 आणि आयपॅड एअर 2 यांना iOS 14 अपडेट मिळणार नाही.