26 September 2020

News Flash

Apple iPhone XS : या रंगात येणार नवीन iPhone, फोटो लीक

Apple iPhone XS : आयफोन विविध रंगामध्ये असणार आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

Apple iPhone XS : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Apple या वर्षी तीन नवे iPhone लॉन्च करणार आहे. १२ सप्टेंबर रोजी ‘अॅपल’तर्फे ‘आयफोन’ची सुधारित आवृत्ती सादर होणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार आयफोनचे तीन नवे फोन लॉन्च करण्यात येणार आहेत. जसजसे आयफोन लॉन्चची तारिख जवळ येते तसंतसे त्याबाबतची माहिती लीक होत आहे. एका नव्या रिपोर्टनुसार लॉन्च होणारे आयफोन विविध रंगामध्ये असणार आहेत.

६.१ इंच एलसीडी आयफोनचे फोटोज लीक झाले आहेत. एका फोटोमध्ये तीन आयफोन उलटे ठेवण्यात आले आहेत. पांढरा, लाल आणि निळ्या रंगामध्ये हे तिन्ही फोटो आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार नवे आयफोन या तीन रंगामध्ये असणार आहेत. लीक झालेल्या फोटोवरून हा फोन ६.१ इंच उंच असून त्याला सिंगल रिअर कॅमेरा आहे. फोनच्या खाली दोन्ही बाजून स्पीकर आणि मध्ये एक पोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या डाव्या बाजूला पावर बटन आणि दोन सीन कार्डचे स्लॉट दिले आहे. जर लीक झालेले वृत्त खरे ठरल्यास हा आयफोन पहिलाच असेल ज्यामध्ये ड्युल सीम असणार आहे. ड्युएल सिम मोबाईलमुळे भारतात अॅपलचा मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण २ टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

iPhone XS, iPhone 9 आणि iPhone XS Plus अशी नावं असतील. अॅपल आयफोन 2018 च्या व्हेरिअंटमध्ये 5.9 इंचाचा ओलेड डिस्प्ले असेल. दुसरं व्हेरिअंट 6.5 इंच ओलेड डिस्प्ले असलेला प्रीमियम व्हेरिअंट असण्याची शक्यता आहे. तर तिसरं व्हेरिअंटमध्ये 6.1 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल, तसंच या आयफोनची किंमतही कमी असेल.

लेस न्यूमेरिक्सने दिलेल्या वृत्तानुसार, अॅपलच्या तिन्ही नव्या iPhone चे फोटो लीक झाले असून Apple या वर्षीच तीन नवे iPhone लॉन्च करणार आहे. केवळ फोटोच नाही तर एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. Mobile Fun या युट्यूब चॅनलने iPhone XS, iPhone 9 आणि iPhone XS चा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सर्व अॅंगलने आयफोनची झलक दाखवण्यात आली असून, लॉन्च होणारे आयफोन हुबेहुब असेच असतील असा दावा करण्यात आला आहे.

अॅपलचा कमी किंमतीचा एलसीडी डिस्प्ले असलेला फोन iPhone 9 नावाने लॉन्च होईल. यामध्ये बॅक पॅनलला ग्लास बॉडी आणि सिंगल रिअर कॅमेरा असेल. 5.8 इंच ओलेड डिस्प्ले असलेल्या फोनचं नाव iPhone XS असेल. याच्याही बॅक पॅनलला ग्लास बॉडी आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. तर 6.5 इंच ओलेड डिस्प्ले असलेल्या प्रीमियम आयफोनचं नाव iPhone XS Plus असेल. या फोनला वायरलेस चार्जिंगचा पर्याय असेल, तसंच याच्याही बॅक पॅनलला ग्लास बॉडी आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.

काय असू शकते किंमत –
– iPhone 9 ची किंमत 600 ते 700 डॉलर म्हणजेच जवळपास 41,000 ते 47,900 रुपये असू शकते.
– iPhone XSची किंमत 700-800 डॉलर म्हणजेच जवळपास 47,900 ते 54,700 रुपये असू शकते.
– iPhone XS Plusची किंमत 999 डॉलर म्हणजे जवळपास 68,300 रुपयांपासून सुरू होऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 7:43 pm

Web Title: apple new leaked photos suggesting colour varients for upcoming iphone
Next Stories
1 सिद्धू यांच्या पाक दौऱ्याबाबत राहुल गांधी गप्प का? : स्मृती इराणी
2 उपोषणाच्या १४व्या दिवशी हार्दिक पटेलची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
3 FB बुलेटीन: राम कदम पुन्हा चुकले, चंद्रकांत पाटील यांचा यू- टर्न व अन्य बातम्या
Just Now!
X