आघाडीची टेक कंपनी Apple ने भारतात नवीन MacBook Air आणि iPad Pro  हे दोन डिव्हाइस लाँच केले आहेत. यापैकी MacBook Air हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त MacBook , तर  iPad Pro हा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल आयपॅड असल्याचे सांगितले जात आहे.

कंपनीने नवीन मॅजिक की-बोर्डसोबत MacBook Air नवीन व्हेरिअंटमध्ये आणले आहे. नव्या MacBook Airमध्ये दर्जेदार CPU परफॉर्मंस आणि 80 टक्के अधिक जलद ग्राफिक्स दिल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.  MacBook Air च्या नव्या व्हेरिअंटमध्ये 256GB स्टोरेज असून तब्बल 2TB पर्यंत वाढवता येणे शक्य आहे, म्हणजे सध्याच्या रेंजच्या तुलनेत स्टोरेज दुप्पट आहे. यात13 इंच रेटिना डिस्प्ले, टच आयडी आणि मोठा टेकपॅड आहे. कंपनीने पहिल्यांदा MacBook मध्ये क्वॉड-कोर प्रोसेसरचा वापर केलाय. यामध्ये 1.2GHz क्वॉड-कोर i7 प्रोसेसर दिला असून नवीन MacBook सध्या उपलब्ध असलेल्या जनरेशनपेक्षा दुप्पट जलद असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Appleने सर्वात पॉवरफुल आयपॅडही केला लाँच –
Appleने भारतात आपला सर्वात पॉवरफुल आयपॅडही लाँच केला आहे. बहुतांश विंडोज पीसी, लॅपटॉपपेक्षा iPad Pro अधिक जलद असल्याचं कंपनीचा दावा आहे. नवीन आयपॅड प्रो दोन डिस्प्ले साइजमध्ये लाँच करण्यात आला आहे. आयपॅड प्रो 11 इंच आणि 12.9 इंच डिस्प्ले अशा दोन साइजमध्ये आलेल्या या आयपॅड प्रोमध्ये A12Z बायोनिक चिप असून अल्ट्रा वाइड कॅमेऱ्यासोबत LiDAR स्कॅनरही आहे. हा आयपॅड सिल्वर आणि स्पेस ग्रे अशा दोन कलरच्या पर्यायात उपलब्ध असेल. नवीन आयपॅडमध्ये 8 कोर GPU सोबत A12Z बायोनिक चिपसेट आहे, यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल iPad ठरतो असं सांगितलं जात आहे. सिंगल चार्जमध्ये नवीन आयपॅड 10 तासांचा बॅकअप देईल असाही दावा कंपनीने केलाय. याशिवाय यामध्ये 12MP वाइड कॅमेरा आणि 10MP अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत
MacBook Air च्या नव्या व्हेरिअंटची बेसिक किंमत 92 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे.
iPad Pro 11 इंच वाय-फाय मॉडेलची किंमत 71,900 रुपये आहे. तर, वाय फाय+ सेल्युलर मॉडेलची किंमत 85,900 रुपये आहे.
याशिवाय, iPad Pro 12.9 इंच मॉडेलची किंमत 89,900 रुपये आणि वाय फाय+सेल्युलर मॉडेलची किंमत 1,03,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.