9 जानेवारी 2001 रोजी अॅपल कंपनीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) आणि सह-संस्थापक स्टिव्ह जॉब्स यांनी iTunes सॉफ्टवेअर लाँच केलं होतं. म्युझिकच्या दुनियेत हे सॉफ्टवेअर क्रांती आणणारं ठरलं. या सॉफ्टवेअरद्वारे 21 व्या शतकात लोकांपर्यंत डिजिटल म्युजिक पोहोचवणं सहज शक्य झालं. आता 18 वर्षांचा हा प्रवास संपण्याची शक्यता आहे, माध्यमांतील वृत्तानुसार कंपनी हे अॅप लवकरच बंद करण्याच्या विचारात आहे.

bloomberg च्या वृत्तानुसार, iPhones, Macs आणि iPads ची निर्माता कंपनी अॅपल त्यांचं iTunes हे अॅप बंद डेव्हलपर कॉन्फरंसमध्ये बंद करण्याची घोषणा करेल. 3 जून अर्थात आजपासून या कॉन्फरंसला सुरूवात होत आहे. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पायरसी रोखण्यात iTunes ची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. याचा फायदा जगभरातील म्युझिक इंडस्ट्रीला झाला.

का बंद होणार iTunes –
iTunes बंद करण्याचा निर्णय आश्चर्यकारक नाहीये, गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा होतीच. कारण, आता जगभरात अनेक प्रकारच्या सब्सक्रिप्शन बेस्ड म्युझिक स्ट्रीमिंग सर्विस उपलब्ध आहेत, यात कंपनीच्या अॅपल म्युझिक या अॅपचाही समावेश आहे. या सर्वांचा परिणाम आयट्यून्सवर झाल्याने हे अॅप बंद करुन त्याऐवजी एखादी नवी सेवा कंपनी सुरू करु शकते. आय-ट्यून्स मधील सॉग्न पर्चेस, फोन सिंकिंग यासख्या सुविधा बंद करून उर्वरित सुविधा अॅपल टिव्हि, अॅपल म्यूझिक आणि पॉजकास्ट अश्या तीन वेगळ्या माध्यमातून उपलब्ध करण्याची शक्यता आहे.