X

Apple September Event 2018 : सिम कार्डच्याबाबतीत आयफोनचे हे आनोखं गिफ्ट

Apple September Event 2018 : यावर्षी कंपनी नवीन ३ मॉडेल लाँच करणार आहे.

Apple September Event 2018 : उद्या आफोनचे तीन नवीन फोन लॉन्च होणार आहेत. अँड्रॉईडमध्ये ड्युएल सिमकार्डची सुविधा आल्यानंतर अनेक जण अॅपलकडून इतर कंपन्यांकडे वळले. मात्र आता या सगळ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत असल्याचे नुकतेच समजले आहे. याआधीही बऱ्याचदा अॅपल आपल्या नवीन मॉडेलमध्ये ड्युएल सिमची सुविधा देणार अशी चर्चा होती, मात्र आता ते प्रत्यक्षात आले आहे.

iPhone X plus आणि एलसीडी डिस्प्लेसोबत येणाऱ्या इतर फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा असेल असे सांगण्यात येत होते. अॅपल कंपनी ही सुविधा खास आशियायी बाजारपेठेसाठी आणू शकते. ड्युएल सिम मोबाईलमुळे भारतात अॅपलचा मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण २ टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

यावर्षी कंपनी नवीन ३ मॉडेल लाँच करणार आहे. यातील एक फोन लो बजेट असेल. iPhone X या फोनला ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल. याबरोबरच आताच्या फोनप्रमाणेच ५.८ इंचाचा डिस्प्ले असलेले iPhone X चे आणखी एक व्हर्जन दाखल होईल. याशिवाय सर्वात महागडा असलेला iPhone X plus हा ६.५ इंचाच्या ओएलईडी स्क्रीनसोबत येईल. आयफोनच्या या तिन्हीही व्हर्जनला पुढच्या बाजूने फेस आयडीचे फिचर असेल. त्यामुळे या नव्या फिचरसह येणाऱ्या आयफोनची ग्राहकांना मोठी उत्सुकता आहे.

‘केजीआय सिक्युरीटीज’ या तैवानमधील अग्रगण्य कंपनीतील तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध तज्ञ मिंग-ची कुओ यांनी लिहीलेल्या एक ब्लॉगमध्ये २०१८पासून येणाऱ्या सर्व आयफोनच्या मॉडेलमध्ये ड्युएल सिम सपोर्ट असल्याचे नमूद केले होते. विशेष म्हणजे या आयफोनमधील देन्ही सिम स्लॉट हे ‘एलटीई’ प्रकारातील असतील. सध्या बाजारात उपलब्ध असलेले सर्व ड्युएल सिम फोन हे ‘एलटीई’ आणि ‘थ्री जी’ प्रकारातले आहेत. ‘एलटीई’ म्हणजे फोरजी आणि त्यावरील तंत्रज्ञान असणाऱ्या सीम कार्डवर चालणारे फोन. ‘२०१८ मध्ये बाजारात येणाऱ्या आयफोनमध्ये ‘एलटीई’ ट्रान्समिशन स्पीडबरोबरच ड्युएल स्टॅण्डबाय फिचरही उपलब्ध होईल. ‘एलटीई-थ्री जी’ऐवजी या फोनमध्ये ‘एलटीई-एलटीई’ तंत्रज्ञान असेल, असा उल्लेख कुवोंनी त्यांच्या लेखात केला आहे.

 

First Published on: September 11, 2018 7:38 pm
  • Tags: apple event 2018, iPhone Xc, iphone xr, iphone xs, iphone xs max, iPhone Xs Plus,
  • Outbrain

    Show comments