News Flash

मेक इन इंडिया : अ‍ॅपलने भारतात सुरू केलं iPhone 12 चं उत्पादन

आयफोन १२ चं उत्पादन भारतात सुरू

दिग्गज टेक कंपनी अपलने भारतात आयफोन १२ चं उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. कंपानीकडून गुरुवारी एका निवेदनाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. भारतात आयफोन १२ चं उत्पादन सुरू करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं कपनीने आपल्या निवेदनात म्हटलं.

भारतात आयफोनचं उत्पादन घेण्यासाठी अ‍ॅपलने फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉन या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. भारतात आयफोन एसई, आयफोन १०आर आणि आयफोन ११ यांचं उत्पादन सुरू आहे, आणि आता आयफोन १२ च्या उत्पादनालाही सुरूवात झालीये. “भारतात आयफोन १२ चं उत्पादन सुरू करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे” असं कंपनीने आपल्या निवेदनात सांगितलं. पण नेमक्या कोणत्या पुरवठादाराकडून आयफोन १२ चं उत्पादन घेतलं जात आहे याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. मात्र माध्यमांतील वृत्तानुसार, फॉक्स्कॉनच्या तामिळनाडूमधील कारखान्यात आयफोन १२ च्या उत्पादनाला सुरूवात झाली असल्याचं समजतंय. तरी फॉक्सकॉनने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.


जानेवारी महिन्यातच अ‍ॅपलने या तिमाहीत भारतात आयफोन १२ चं उत्पादन सुरू करणार असल्याचं सांगितलं होतं. यामुळे मेक इन इंडिया मोहिमेलाही बळ मिळेल. भारताला मोबाईल आणि घटकांच्या निर्मितीचे मोठे केंद्र बनवण्याचे आमचे प्रयत्न जगाचं लक्ष वेधून घेत आहेत हे पाहून आनंद झाला, यामुळे मोठ्या संख्येने रोजगाराची संधी उपलब्ध होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 10:02 am

Web Title: apple starts iphone 12 assembly in india sas 89
Next Stories
1 ‘बजेट’ सेगमेंटमध्ये Samsung चा दमदार स्मार्टफोन लाँच, तब्बल 6000mAh बॅटरी + 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप
2 स्वस्त स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट, मिळेल 6000mAh बॅटरी + क्वॉड रिअर कॅमेरा सेटअपही
3 JioBusiness प्लॅन्सची सुरूवात 901 रुपयांपासून, जाणून घ्या सविस्तर
Just Now!
X