News Flash

Apple iPad Air, iPad 8 लाँच; पाहा काय आहे विशेष

जाणून घ्या किती आहे किंमत

अ‍ॅपलनं आपल्या इव्हेंटदरम्यानं Apple iPad Air लाँच केला आहे. टाईम फ्लाईज या इव्हेंटदरम्यान कंपनीनं Apple Watch Series 6 सह अन्य प्रोडक्ट्सही लाँच केले. Apple iPad Air हा लूकमध्ये एकदम iPad Pro प्रमाणेच दिसतो. यामध्ये १०.९ इंचाचा लिक्विड रॅटिना डिस्प्ले देण्यात आला असून 2360X1640 इतकं रिझॉल्यूशन देण्यात आलं आहे.

iPad Air मध्ये रिफ्लेक्टिव्ह कोटिंग देण्यात असून वरील भागात एक पॉवर बटनही देण्यात आलं आहे. याच बटनामध्ये फिंगरप्रिन्ट स्कॅनरही देण्यात आला आहे. याला अॅपल ही कंपनी टच आयडीदेखील म्हणते. Apple iPad Air मध्ये अत्याधुनिक असा A14 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच तो ५ नॅनोमीटर बेस्ड आहे. गेल्या वर्षीच्या iPad Air च्या तुलनेत हा ४० टक्के जलद असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तसंच कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार यातील ग्राफिक्सही यापूर्वीच्या मॉडेल्सच्या तुलनेत उत्तम असून यात कंपनीनं ४ कोअर जीपीयू वापरला आहे.

नव्या आयपॅडमध्ये कंपनीनं यूएसबी टाईप सी कनेक्टिव्हीटी दिली आहे. तसंच सेकंड जनरेशन Apple Pencil देखील लाँच केली आहे. या टॅबमध्ये सिंगल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे. Apple iPad Air 2020 ची किंमत ही ५९९ डॉलर्सपासून सुरू होणार आहे. तसंच नव्या iPad Air मध्ये मॅजिक कीबोर्डचाही सपोर्ट देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त यात पूर्वीपेक्षा उत्तम LTE सपोर्ट मिळणार असल्याचा दावाही कंपनीनं केला आहे.

याच इव्हेंटमध्ये कंपनीनं iPad 8 देखील लाँच केला आहे. iPad 8 मध्ये A12 बायॉनिक चिपसेट देण्यात आला आहे. तसंच यात टच आयडी सपोर्टही देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त यात स्मार्ट कीबोर्ड कवर आणि Apple Pencil चाही सपोर्ट देण्यात आला असल्याचं कंपनीनं सांगितलं.

किती आहे किंमत?

iPad Air चा 64GB (Wi-Fi) व्हेरिअंट – 599 डॉलर
iPad Air चा 64 GB (Wi-Fi+ Cellular) व्हेरिअंट – 729 डॉलर
iPad Air चा 256GB (Wi-Fi) व्हेरिअंट – 749 डॉलर
iPad Air चा 256GB (Wi-Fi+ Cellular) व्हेरिअंट – 879 डॉलर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 8:18 am

Web Title: apple virtual event company launched new ipad air iwatch today know more specification price jud 87
Next Stories
1 Apple Watch Series 6 लाँच; ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर फिचरचाही समावेश
2 बहुगुणी तीळ! जाणून घ्या, ‘हे’ १० फायदे
3 गुणकारी कवठ! जाणून घ्या हे फळ खाण्याचे ६ फायदे
Just Now!
X